Ek Swapna Punha Punha (एक स्वप्न पुन्हा पुन्हा) : Gulzar / Tr. Vijay Padalkar (गुलज़ार / अनु. विजय पाडळकर)
ज्यांच्या संपूर्ण अस्तित्वामध्ये कविताच डुंबून गेलेली जाणवते त्या गुलजारांच्या कवितांचा अनुवाद, जागतिक साहित्याचा अभ्यास असणाऱ्या विजय पाडळकरांसारख्या रसिकाने करावा ही मराठी साहित्यातली एक घटनाच मानायला हवी. कवी एका भाषेतून दुसऱ्या भाषेत जातो तेव्हा मूळ कवी आणि अनुवादक एकमेकांत संपूर्णपणे संक्रमित हवे लागतात. या पुस्तकात त्याचाच विलक्षण अनुभव येतो. गुलजारांची कविता म्हणजे फाळणीच्या इतिहासाची सल. त्यांची कविता म्हणजे त्यांची अशी एक स्वतंत्र प्रतिमासृष्टी. गुलाजारांच्या कविता म्हणजे त्यांच्या कॅमेऱ्यातून निसटून कागदावर उतरलेली इमॅजिनरी… ‘एक स्वप्न पुन्हा पुन्हा…’च्या निमित्ताने गुलजारांची कविता प्रथमच मराठी रसिकांना उपलब्ध झाली आहे.
ISBN: 978-81-7185-877-4
Number of pages: 112
Language: Marathi
Year of Publication: Reprint 2019