अझीझ बेची शोकान्तिका – आयफर टंक

150.00 Original price was: ₹150.00.120.00Current price is: ₹120.00.

Aziz Beychi Shokantika

विविध जागतिक भाषांतील उत्तम साहित्य आपल्या भाषेत अनुवादित करून घेतल्यामुळे उत्तम साहित्याचा आस्वाद घेता येतो. तसेच त्या त्या देशांच्या संस्कृतीचा परिचयही होतो. म्हणूनच पॉप्युलरने असे उत्तम साहित्य मराठीत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. या उपक्रमात या वर्षी तुर्की भाषेतल्या सात महत्त्वपूर्ण कादंबऱ्यांचे अनुवाद प्रकाशित करण्याचे निश्चित झाले. त्यांपैकी ही एक कादंबरी.

तुर्की भाषेतील लोकप्रिय लेखिका आयफर टंक यांच्या ‘अझिझ बे इन्सिडन्ट’ या कादंबरीचा ‘अझिझ बेची शोकान्तिका’ या नावाने अरुणा श्री. दुभाषी यांनी केलेल्या अनुवादामधून एका वेगळ्या धार्मिक संस्कृतीचा परिचय होतो. तुर्की व भारतीय संस्कृतीतील मैलाचे अंतर सहजतेने कमी करीत ही कांदबरी एका वेगळ्याच सामाजिक प्रश्नावर प्रकाश टाकते.

अझिझ बे हे या कांदबरीचे मध्यवर्ती पात्र. हे पात्र ज्या तऱ्हेने कांदबरीत घडत जाते ती प्रक्रिया वैशिष्ट्यपूर्ण आहे. कांदबरीची सुरुवात अझिझ बेच्या मृत्यूच्या घटनेपासून होते. आणि ती पुढे सरकत राहते ती मृत्यूपूर्व घटनेपर्यंत. या प्रवासात अझिझ बेचे बालपण, प्रौढपण, कुटुंब, आवड, प्रावीण्य त्याबरोबरच त्यांच्या स्वभावातले अनेक कंगोरेही उलगडत जातात.

‘अझिझ बेची शोकान्तिका’ ही एकाचवेळी एका संगीतकाराची आणि त्याचवेळी एका सामान्य माणसाचीही शोकान्तिका आहे. कलावंत आणि सामान्य माणूस यांच्यातील तोल उत्तमपणे सांभाळून कांदबरी पुढे जाते. यातच कांदबरीचे मोठे यश आहे.

कांदबरीत अनोळखी, परिचित, परकी वाटणारी अशी संस्कृती जेव्हा आपल्या समोर येते तेव्हा तिच्यातील उत्कट, व्यामिश्र आणि तितक्याच खोल अनुभवापुढे सांस्कृतिक परकेपण जवळचे, आपले असे परिचित बनत जाते. आणि कांदबरी थेट मनाला जाऊन भिडते.

ISBN: 978-81-7185-397-7

No. of Pages: 96

Year of Publication: 2015