किराझे – सोलमाझ कामुरान

450.00 Original price was: ₹450.00.360.00Current price is: ₹360.00.

Kiraze

सोलमाझ कामुरान

अनुवाद : शर्मिला फडके

विविध जागतिक भाषांतील उत्तम साहित्य आपल्या भाषेत अनुवादित करून घेतल्यामुळे उत्तम साहित्याचा आस्वाद घेता येतो. तसेच त्या त्या देशांच्या संस्कृतीचा परिचयही होतो. म्हणूनच पॉप्युलरने असे उत्तम साहित्य मराठीत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. या उपक्रमात तुर्की भाषेतल्या महत्त्वपूर्ण कादंबऱ्यांचे अनुवाद प्रकाशित करण्याचे निश्चित झाले. त्यांपैकी ही एक कादंबरी.

तुर्की भाषेतील ज्येष्ठ लेखिका सोलेमाझ कामुरान यांची ‘किराझे’ ही कादंबरी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. सोळाव्या शतकातले ओटोमन साम्राज्य, त्यावेळची राजकीय, सामाजिक परिस्थिती स्पेनमधल्या धर्मकांडांनंतर तिथल्या ज्यू नागरिकांनी इस्तंबूलमध्ये केलेले स्थलांतर या घटनेभोवती ह्या कादंबरीचे कथानक गुंफले आहे. ‘किराझे’ या मुख्य पात्राभोवती फिरणाऱ्या या कादंबरीचे कथानक कल्पितापेक्षा सत्य अद्भुत असते याचा प्रत्यय देणारे आहे.

आपल्याला परिचयाचे वाटणारे, आपल्या संस्कृतीशी एकरूप होणारे ह्या कथानकातील रीतिरिवाज, राजकीय कौटुंबिक बारकावे परिचयाचे होत जातात. चार शतकांचा आवाका असणारी ही कादंबरी वाचताना वाचक पूर्णपणे या कथानकात गुंतून जातो. शर्मिला फडके यांनी रंजक पद्धतीने ह्या कादंबरीचा अनुवाद केला आहे.

ISBN: 978-81-7991-997-2

No. Of Pages: 376

Year Of Publication: 2022

Weight 440 kg
Dimensions 21.59 × 13.97 × 1.7 cm