Aata Ujadel! (आता उजाडेल)! – Madhav Kondvilkar (माधव कोंडविलकर)
एखाद्याच कावबरीतून ज्यांच्या लेखनाची, प्रतिभेची ताकय उमजून येते अशा मोजक्याच लेखकांपैकी माधव कोंडविलकर हे एक आहेत.
मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे या त्याच्या पहिल्या आत्मचरित्रात्मक कादबरीचे समाजातील विविध स्तरांतील मान्यवरांकडून कौतुक झाले, तिचा ग्रंथ भाषेत अनुबाद प्रसिद्ध इराला, तिला अमाप लोकप्रियता मिळाली, या आणि त्याच्या इतर आत्मचरित्रात्मक कादंब-याबरोबरच कोंडविलकरांनी इतर स्वतंत्र लेखनाही बरेच केले आहे. शोषित समाजाचे दुःख, दारिद्ध, अज्ञान आणि त्यातून निर्माण होणारी सोकात्म परिस्थिती हा त्यांच्या चिंतनाचा आणि लेखनाचा विषय आहे.
‘आता उनाडेल’ ही महार जातीतील एक होतकरू मुलगा सुधीर आणि चांभारवाड्यातील तरुणी नलिनी यांच्या आंतरजातीय विवाहाची कथा. यात या दोघांना आणि मुलीच्या आईवडिलांना त्यांच्या जातीने दिलेल्या मनस्तापाची कहाणी येते. आपला समाज, जाती यांच्या भिंतींमध्ये पिढ्यानपिढ्या बंदिस्त राहणाऱ्या आणि तेच योन्य व श्रेष्ठ असे मानणाऱ्या मानसिकतेचे प्रभावी चित्रण कोंडविलकरांनी या कादंबरीत केले आहे. या भिंती तोडू पाहणान्या, बाहेरच्या मोकळ्या आभाळाचे दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या काही मोजक्या विचारवंतांनाच चूक उरवून बहिष्कृत केले जाते हे आजही ग्रामीण जीवनात जाणवणारे विदारक सत्य प्रथमच कोडविलकरांनी आपल्या कादंबरीतून मांडले अराहे.
परंतु या कादंबरीचा शेवट पूर्णपणे शोकात्म किंवा निराशाजनक नाही. ‘आता उजाडेल’ या नावातूनच एका नव्या पहाटेचे स्वप्न लेखकाने साकारले आहे. सुधीर आणि नलिनी यांच्या विवाहामुळे जातीव्यवस्थेच्या भिंतींना तहे पडण्यास मदत होईल आणि भविष्यात त्या पूर्णपणे कोसळून पडतील असा आशावाद यातून व्यक्त होतो.
ISBN: 81-7185-681-0
Number of pages: 136
Language: Marathi
Cover: Paperback
Year of Publication: 2001