बहुरूपी / चिंतामण गणेश कोल्हटकर

1,200.00 Original price was: ₹1,200.00.840.00Current price is: ₹840.00.
चिंतामण गणेश कोल्हटकर यांना ‘बहुरूपी’ या पुस्तकाकरिता १९५८ साली साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साहित्य अकादमी प्राप्त झालेले हे मराठीतील तिसरे पुस्तक असून विशेष महत्त्वाची बाब म्हणजे ‘आत्मचरित्र’ या विभागातील हे पहिलेच पुस्तक ठरले. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याशी झालेल्या भेटीप्रसंगी त्यांनी कोल्हटकरांना केलेले ‘बहुरूपी’ असे संबोधन, जे कोल्हटकरांच्या व्यक्तित्वाला साजेसे आणि त्यांचा आजवरचा नट, नाट्यसूत्रधार, दिग्दर्शक, निर्माता, नाट्यसंस्थेचे संस्थापक-संचालक असा बहुआयामी प्रवास अधोरेखित करणारे असे, चित्रदर्शी संबोधन होते. त्यामुळे कोल्हटकरांनीही मग आजपावेतो घडलेल्या आपल्या नाट्यप्रवासाच्या कथनासाठी ‘बहुरूपी’ हेच शीर्षक योजले.

Bahurupi / Chintaman Ganesh Kolhatkar (बहुरूपी / चिंतामण गणेश कोल्हटकर)

कै. चिंतामणराव कोल्हटकरांसारख्या एका कसलेल्या नटाच्या, श्रेष्ठ दिग्दर्शकाच्या व अनुभववृद्ध नाट्यव्यवसायिकाच्या या आत्मकथेने मराठीतील आत्मचरित्रपर वाङ्मयात फार वरचे स्थान मिळवले आहे. चिंतामणरावांच्या पीळदार, तीव्र व प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाबरोबरच मराठी रंगभूमी, नाट्यकला व नाट्यवाङ्मय आणि या माध्यमांच्या साहाय्याने व्यक्त झालेली कसदार मराठी प्रतिमा यांचे जे विलक्षण दर्शन ‘बहुरूपी’ने घडवले, त्याने अवघा मराठी वाचक थारून गेला. सर्वसाधारण वाचकाने मोठ्या उत्साहाने विकत घेऊन या पुस्तकाची आपली आवड व्यक्त केली, तर चोखंदळ टीकाकारांनी कधी नव्हे ते एकमुखाने त्याच्या वाङ्मयीन गुणांची प्रशंसा केली. भारत सरकारची साहित्य अकादेमी व मुंबई सरकार यांनी श्रेष्ठ मराठी ग्रंथासाठी ठेवलेली वार्षिक पारितोषिके देऊन या ग्रंथाचा जो गौरव केला, त्यात वाचकांची आवड व टीकाकारांची प्रशंसा प्रातिनिधिक रीतीने व्यक्त झाली, असे म्हणायला हरकत नाही. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने प्रसिद्ध केलेल्या ‘दि न्यू ब्राह्मन्स’ या पुस्तकात ‘बहुरूपी’तील काही भाग भाषांतर करून घेऊन समाविष्ट केला आहे. चिंतामणरावांनी आयुष्याच्या अखेरीस वठवलेली (पण पूर्वपरिचयाची) लेखकाची भूमिका त्यांच्या इतर भूमिकांप्रमाणे अत्यंत यशस्वी झाली व मान्यता पावली.

– श्री. पु. भागवत

 

Weight 0.900 kg
Dimensions 21.59 × 13.97 × 3.2 cm
ISBN

978-81-7185-784-5

Pages

610

Binding

Hardbound with Jacket

Edition

5th Edition 2026