पॉप्युलर रीतिपुस्तक : रामदास भटकळ / मृदुला प्रभुराम जोशी

885.00 Original price was: ₹885.00.708.00Current price is: ₹708.00.

Non-Fiction

Ramdas Bhatkal / Mrudula Prabhuram Joshi (रामदास भटकळ / मृदुला प्रभुराम जोशी) : Popular Reetipustak पॉप्युलर रीतिपुस्तक (लेखक, संपादक, मुद्रक, मुद्रितशोधक, प्रकाशक यांच्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन.)

लेखक लिहून मोकळा होतो. हस्तलिखित प्रकाशकाच्या हाती येते. म्हणजेच ग्रंथाच्या बाळंतपणाला सुरुवात होते. प्रकाशक सुईणीची भूमिका बजावत असतो. प्रमाणित मजकूर हातात पडल्यानंतर पुस्तकाची मांडणी, मुखपृष्ठ, मलपृष्ठ, पाठराखण, अक्षरलेखन, आकार, कागद अशी जुळवाजुळव सुरू होते. कोणताही ग्रंथ जसा लेखकाचा तसाच प्रकाशकाचाही असतो. कारण एक क्रयवस्तू म्हणून ग्रंथाला बाजारात आणण्यात लेखकापेक्षा प्रकाशकच अधिक जबाबदार असतो. या प्रवासाचे एक व्यवस्थापनशास्त्र असते, त्यांचे म्हणून नीती-नियम असतात, या गृहाची एक मूल्यव्यवस्था असते, सुईणीचा एक धर्म असतो. तो धर्म पाळूनच ग्रंथ वाचकांच्या हाती येत असतो. या दीर्घ-गूढ प्रवासाबाबत मराठीत एक अवाक्षरही नाही. ‘रीतिपुस्तक’ हे याबाबतचे मराठी साहित्यातील पहिले विधान आहे. या विधानाचे कर्ते इतके अनुभवी आहेत की ते विधान मराठी वाचक समूह, ग्रंथनिर्मिती क्षेत्रातील सुभाषित म्हणून स्वीकारतील याची खात्री आहे.
– डॉ. राजन गवस
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

या क्षेत्रातील मराठीतील हे पहिलेच रीतिपुस्तक. ‘द शिकागो मॅन्युअल ऑफ स्टाइल’ प्रसिद्ध होऊन शतक उलटून गेले आणि ते आता सोळाव्या आवृत्तीत ऑनलाइन उपलब्ध आहे. मराठी समाज लेखन, मुद्रण आणि प्रकाशनव्यवहार यांच्याकडे पुरेशा गांभीर्याने पाहत नसे हे स्पष्ट करणारी ही गोष्ट आहे. प्रबोधनाची दीर्घ परंपरा युरोपीय समाजाला लाभली आहे.
मराठी प्रकाशनाच्या क्षेत्रात वेगाने घडणाऱ्या बदलांचा पुस्तक प्रकाशनाच्या क्षेत्रात प्रभाव दिसत आहे. पुस्तक प्रकाशन ही संकल्पना, पुस्तकाची निर्मिती आणि त्या निर्मितीसाठी आवश्यक असलेली रीती यांवर झालेल्या परिणामाचा सखोल अभ्यास करून तयार झालेले हे ‘रीतिपुस्तक’ मराठी प्रकाशनविश्वात महत्त्वाचे ठरेल. प्रमाण आणि बोली भाषांच्या वापरापासून पुस्तकाचे मुद्रितशोधन, मुद्रण, सौष्ठवपूर्ण निर्मिती या विविध गोष्टींचा परामर्ष या पुस्तकात घेतला आहे.
– डॉ. दीपक पवार
मराठी अभ्यास केंद्र, मुंबई

ISBN : 978-81-7185-469-1

Publisher : Popular Prakashan Pvt. Ltd

Language: Marathi

Number of page’s : 318

Year of Publication : 1st Reprint 2026