दुर्दम्य : गंगाधर गाडगीळ

880.00 Original price was: ₹880.00.704.00Current price is: ₹704.00.
Sold out

Out of stock

Durdamya (दुर्दम्य) – Gangadhar Gadgil (गंगाधर गाडगीळ)

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावरची ही कादंबरी मराठीतल्या काही श्रेष्ठ कादंबऱ्यांपैकी एक म्हणता येईल. आज लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्ताने या आठवण मनात पुन्हा जागी झाली.
बाळू, बळवंत, बळवंतराव, लोकमान्य आणि निष्काम कर्मयोगी महात्मा या चढत्या श्रेणीच्या विकासमान व्यक्तिमत्त्वाचा आलेख या कादंबरीत गाडगीळांनी काढला आहे. लोकमान्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाचा अनुभव ही कादंबरी देते. टिळकांच्या बहिर्मुखी स्वभावात पुढे चिंतनाच्या स्पर्शाने अंतर्मुखता येते. लोकप्रेम, मित्रप्रेम आणि कुटुंबप्रेम यांत एकरूपता येते. त्यांच्या मूळ प्रवृत्ती आणि त्यांची जीवनध्येये यांत एकात्मता निर्माण होते. कलावंताच्या मर्मदृष्टीतून हा व्यक्तित्वविकास गंगाधर गाडगीळांनी या कादंबरीत रेखाटला आहे.

ISBN: 978-81-7185-421-9

Number of pages: 784

Year of Publication: 1971