Baul (बाउल) – Saumitra सौमित्र
आपल्या भयाण एकाकीपणाचे संदर्भ लागू देऊ नयेत वाचून दाखवू नये कुठलीही कविता
नवीन कविता लिहिल्यावर कवींनी सांत्वनाला भेटावं
समजूतदारपणे घ्यावा आधार एकमेकांचा
सरपटतांना आत कवितेचा साप
भिनू द्यावं विष स्वत:तही
पण कुणाला डंख मारू नये
कधीतरी कविता छापून आल्यावरच
कळावं साऱ्यांना
कवीमध्ये तेव्हाच काही मरून गेल्याचं
आठवणी प्रसंग व्यक्तींचे मृत्यू
डोळ्यांदेखत पचवत कवीने शांत निश्चल बसून राहाव
स्थितप्रज्ञ व्हावं
त्याच्या भवतालची माती
त्याच्या नकळतच ओली होत जावी
आणि आपोआप
गवत उगवत राहाव
ISBN No: 978-81-7991-936-1
No. Of Pages: 250
Language: Marathi
Cover: Paperback
Year Of Publication: 2019