सांजभयाच्या साजणी – ग्रेस

250.00 Original price was: ₹250.00.200.00Current price is: ₹200.00.

कविता

24 in stock

Category:

Sanjbhayachya Sajani

आधुनिक मराठी कवितेत आपल्या पृथगात्म शब्दशैलीचे बेट मुक्रर केल्यावर, आता कवी ग्रेस यांचा, ‘सांजभयाच्या साजणी’ हा पाचवा कवितासंग्रह. कवितेच्या आसमंतातच स्वतःचे समग्र अस्तित्व शोधणे, जिरवणे, मिरवणे या ग्रेस यांच्या निर्मितिप्रक्रियेचा हा एक अनवट, घनघोर टप्पा !

त्यांची ‘काव्यभाषा’ आणि त्यांची ‘आई’ या दोहोंभवती रहस्यमय धुके तर आहेच आहे पण त्याचा अर्थ आपल्याला त्यांच्याकडूनच कळतो आहे, कळणार आहे. त्यांच्याच शब्दात –

माझी आई मत्त वासना संभोगाची भूल क्रूर पशूच्या डोळ्यांमधल्या करुणेचेही फूल…. माझी आई भिरभिर संध्या घेई सूर्य दिलासा नश्वर शब्दांच्याही ओठी काव्यकुळातिल भाषा.

अखंड रहस्यशरण असलेला हा ग्रेस यांच्या निर्मितीचा प्रवास आता, ‘सांजभयाच्या’ आवरणात तात्पुरता थबकला आहे. एखाद्या अविश्रांत पशूसारखा, पुन: पुन्हा दचकून उठण्यासाठीच!

ISBN: 978-81-7185-889-7

No. of pages: 144

Year of Publication: 2006