हॅन्डल विथ केअर : मलिका अमर शेख

110.00 Original price was: ₹110.00.88.00Current price is: ₹88.00.

Fiction

Handle with Care (हॅन्डल विथ केअर) – Malika Amar Shaikh (मलिका अमर शेख)

ही कादंबरी म्हणजे मनुष्यजातीच्या अस्तित्वाची न संपणारी गोष्ट आहे. एका अर्थी लेखिकेचा हा व्यक्ती आणि समष्टीच्या अर्थाने चिंतनशील उत्क्रांत प्रवासच आहे. मनुष्यजातीविषयीची त्यांची चिंतनशीलता तुम्हा-आम्हाला अंतर्मुख करून जीवनाला सामोरे घेऊन जाणारी अशी आहे. ही न संपणारी गोष्ट तुमची, आमची सर्वांचीच आहे.
या कथेतील पात्रांना लेखिका खेळवत नाही तर, ही पात्रे लेखिकेलाच न संपणाऱ्या मानवी जीवनाच्या अस्तित्त्वाला स्वीकारायला लावतात. मानवी जीवनातले सर्व तऱ्हेचे अंतर्विरोध, भावनांचा कल्लोळ आणि अगतिकता सर्वच काही — मानवी जीवनाचे जे भले-बुरे आहे ते या कादंबरीतून व्यक्त होते. लेखिकेने केलेला मानवी जीवनाचा हा प्रत्यय तुम्हा-आम्हाला अंतर्मुख केल्याशिवाय राहणार नाही. सरासरी आयुष्याच्या मर्यादा ओलांडून हा जीवनाचा खळाळता पारदर्शी प्रत्यय, प्रवास, ही नेव्हर एंडिंग स्टोरी तुम्हालाही सर्जनशीलतेचा अनुभव देऊन जाईल.

ISBN: 978-81-7185-941-2

Number of pages: 104

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 2007