समग्र एकांकिका : भाग ३ – विजय तेंडुलकर

300.00 Original price was: ₹300.00.240.00Current price is: ₹240.00.

Fiction

Vijay Tendulkar (विजय तेंडुलकर) Samagra Ekankika : Bhag 3 (समग्र एकांकिका : भाग ३)

समग्र एकांकिका : भाग – ३
विजय तेंडुलकर

विजय तेंडुलकरांच्या नाटकांत, एकांकिकांत नाट्याशयाबरोबरच तंत्र व शैलीमध्ये वेगळेपणा आणणारी, पारंपरिक नाट्यतंत्राची मोडतोड करून नावीन्य शोधणारी, विषयातला वेगळेपणा पोसणारी, सुंदरतेबरोबरच कुरूपतेच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी त्यांची प्रतिभा निरनिराळे प्रयोग करीत परखड वास्तव आपल्यासमोर आणत राहते.
अशा कलाकृतींच्या शोधात असलेल्या कलावंताना, नाट्यसंस्थांना, अभ्यासू-जिज्ञासू वाचकांना सातत्याने नवीन अनुभव देणाऱ्या या एकांकिका तीन भागांत एकत्रित मिळण्याचा योग आला आहे.
तिसऱ्या भागात ‘थीफ! पोलीस !’ सारख्या हास्यरसप्रधान, ‘चित्रगुप्त, अहो चित्रगुप्त !’ सारख्या आधुनिक तंत्रातील फार्सिकल स्वरूपाच्या, तर निव्वळ स्वप्निल रंजनिका म्हणून ‘काही खरं नव्हे!’ सारख्या एकांकिका एकत्रित केल्या आहेत. याशिवाय ‘ब्रह्मांडाची पोकळी आणि अवकाशातील पोल’ सारख्या अप्रकाशित एकांकिकांही प्रथमच वाचकांना उपलब्ध होत आहेत.

या भागातील एकांकिका
काही खरं नव्हे!
अंधेरनगरीतला कंटाळा दिन
एकेकाचा आजार
बिचारे अप्पा बंड करतात
खलित्यांची लढाई (दुसरी)
दाणादाण
थीफ ! पोलीस
चित्रगुप्त, अहो चित्रगुप्त !
ब्रह्मांडातील पोकळी आणि अवकाशाच्या आकाशातील पोल

ISBN : 978-81-7185-824-8

Number of pages : 160

Publisher : Popular Prakashan Pvt. Ltd.

Language: Marathi

Year of Publication : Reprint 2025

Weight 0.195 kg
Dimensions 21.59 × 13.97 cm