वेदांतील विज्ञान – धनंजय देशपांडे

560.00 Original price was: ₹560.00.448.00Current price is: ₹448.00.

Non-Fiction

Sold out

Out of stock

Vedanteel Vidnyan (वेदांतील विज्ञान) : Dhananjay Deshpande (धनंजय देशपांडे)

धनंजय देशपांडे हे एक चिकित्सक आणि अभ्यासू लेखक आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून कार्यरत असतानाही साहित्य, काव्य, संगीत, तत्त्वज्ञान, विज्ञान, कायदा अशा निरनिराळ्या विषयांचे आकर्षण असल्यामुळे त्यांचा व्यासंग चौफेर झालेला आहे. त्यांच्या अभ्यासाचा नवीन विषय म्हणजे ‘वेदांतील विज्ञान’.

या पुस्तकात प्रामुख्याने वेदांतील त्रत्वांचा नव्याने अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यासाठी त्यांची आधुनिक विज्ञानाशी सांगड घातलेली आहे. खगोलशास्त्र, अणुविज्ञान, रसायन, धातुविज्ञान, भौतिकशास्त्र यांसारख्या विषयांतील आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलेले अनेक सिद्धान्त आणि प्रमेये गूढरम्य पद्धतीने कशी दर्शविलेली आहेत त्यांचा मागोवा इथे घेतलेला आहे. यासाठी निव्वळ मूळ संस्कृत ऋचांच्या भाषांतरावर न विसंबता आकृत्या काढून तो विशिष्ट अर्थ सिद्ध करून दाखवलेला आहे. वाचकापुढे ठाशीव पुरावा मांडून लेखकाने प्रतिपादन केले आहे की, हजारो वर्षांपूर्वीसुद्धा भारतातील प्रज्ञावंतांना असंख्य वैज्ञानिक गोष्टी माहीत होत्या किंवा त्यांचे त्यांनी शोध लावले होते. लेखकाने दाखवून दिलेल्या अनेक बाबी जशाच्या तशा स्वीकाराव्या असा त्यांचा आग्रह नाही, परंतु यानिमित्ताने वेदांचा या दिशेने अधिक अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली व विचारमंथन चालू झाले तरी पुस्तक लिहिण्याचे सार्थक होईल.

SBN: 978-81-7185-679-4

Number of pages: 304

Language: Marathi

Year of Publication: Reprint 2020

Dimensions 21.59 × 13.97 cm