Yayati Ani Devyani
ययातीची कथा पिढ्यानपिढ्या कलावंतांना साद देत आली आहे. त्या आख्यानातून जीवनाच्या निरनिराळ्या पैलूंविषयी लिहिले गेले आहे. कचाचे देवयानीविषयीचे निरपेक्ष प्रेम हा शिरवाडकरांच्या नाटकाचा मुख्य गाभा आहे. शिरवाडकरांनी या पूर्वी काही रूपांतरित तर काही स्वतंत्र नाटके लिहिली असली तरी, आपल्याला नाट्यलेखनाचा मंत्र ‘ययाती आणि देवयानी’ नाटकाच्या वेळी सापडला, असे लेखक स्वतः मानतात. प्रयोगाच्या निमित्ताने नाटकाला संगीतरूप देण्यात आले. यासंबंधीची हकीकत या आवृत्तीत देण्यात आली आहे, ती फारच मनोरंजक आहे. हे नाटक रंगभूमीवर इतके यशस्वी ठरले की, गेली पन्नास वर्षे ते सातत्याने निरनिराळ्या संचात रंगभूमीवर यशस्वीपणे सादर होत असते. ‘कौंतेय’ आणि ‘ययाती आणि देवयानी’ या दोन नाटकांमधून महाभारतातील कथा नावीन्यपूर्ण रीतीने रंगभूमीवर आणण्याची किमया शिरवाडकरांनी केली आहे. या नाटकात कचाची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते रामदास कामत यांचा महत्त्वाचा लेखही पुस्तकात समाविष्ट केला आहे.
ISBN: 978-81-7185-774-6
No. of pages: 88
Year of publication: 1966