अग्निदिव्य – अशोक पाटोळे

95.00 76.00

नाटक

Category:

Agnidivya

य. दि. फडके यांच्या ‘शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक’ या पुस्तकातील ‘ताईमहाराज प्रकरण’ आणि ‘वेदोक्त प्रकरण’ ह्या दोन प्रकरणांवर आधारित असलेल्या या नाटकातून एक ऐतिहासिक घटना प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर येते. नाटकातील सामाजिक आशय, शाहू महाराजांचा जातिभेदविषयक संघर्ष आणि टिळक-शाहू महाराज यांच्यातील खटकेबाज संवाद यांमुळे या नाटकाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली आहे.

छत्रपति शाहू महाराजांच्या जातिभेदविषयक संघर्षाला आज शंभर वर्षे उलटून गेली तरी महाराष्ट्रातला जातिभेद तसूभरही कमी झालेला नाही. ह्या नाटकामुळे सद्यःस्थितीत महत्त्वाचा ठरणारा ऐतिहासिक संघर्ष पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आला आहे. एखाद्या विषयाला नाट्यरूप देऊन प्रसंगांची उत्तम मांडणी आणि परिणामकारक संवाद यांद्वारे ते यशस्वी करून दाखविण्याचे कसब अशोक पाटोळे यांनी या नाटकात उत्तम साधले आहे.

ISBN: 978-81-7185-849-1

No. of Pages: 80

Year Of Publication: 2011