Manoos Navache Bet
‘नाटकी’ नसलेले नाटक लिहून पाहावे. वाढत्या परिणामाचा (Impact) सख्त आणि निव्वळ तांत्रिक हिशेब न करता एक विशिष्ट वेधक, परिणामकारक अनुभव जास्तीत जास्त साधेपणाने, सच्चेपणाने आणि तरीही शक्य तेवढा नाट्यपूर्ण पद्धतीने मांडण्याचा एक प्रयत्न करावा याच मुख्य भूमिकेतून ‘माणूस नावाचे बेट’ हे नाटक जन्मले. एका विशिष्ट विचाराच्या वा हेतूच्या प्रचारार्थ ते रचले गेले नाही, तर एक विशिष्ट परिस्थिती आणि त्या परिस्थितीत मध्यम वर्गांतली चार सामान्य बुद्धिजीवी माणसे अशा एका अनुभवातून त्याचा जन्म झाला.
– विजय तेंडुलकर
ISBN: 978-81-7185-881-1
No. of pages: 106
Year of publication: 1953