प्रेमा, तुझा रंग कसा? : वसंत कानेटकर

135.00 Original price was: ₹135.00.108.00Current price is: ₹108.00.

Fiction

Category:

Prema, Tuza Rang Kasa? (प्रेमा, तुझा रंग कसा?) – Vasant Kanetkar (वसंत कानेटकर)

पहिल्या उत्कट, आंधळ्या ओढीचा गुलाबी रंग, नंतरच्या रुसण्या रागावण्याचा लाल रंग, पुढच्या कडू भांडणाचा काळा रंग – सारे प्रेमाचेच रंग! अनुराग, राग, विरह, कलह – या साऱ्या प्रेमाच्याच अटळ अवस्था! प्रेम ही मोठी उदात्त भावना खरीच, पण तिला विवाहाचं व्यवहारी रूप आलं की अनेक विसंगती प्रगट होतात… उदात्तातली विसंगती – जे ‘मोठं’ त्याचं ‘खोटेपण’ म्हणजे विनोदी लेखणीच्या चेष्टांना भरपूर अवसर देणारं आंगणच!
प्रा. वसन्त कानेटकरांनी आपल्या पहिल्या विनोदी नाटकासाठी प्रेमाच्या बदलत्या रंगाचा विषय निवडण्यात अव्वल दर्जाची प्रतिभा व्यक्त केली आहे. विषयाची चतुर निवड केली की नाटककाराने अर्धी लढाई जिंकली म्हणतात. बाकीची अर्धी जिंकण्यासाठी जरुरी असते, अवश्य ती रंगत साधून विषय खेळविण्याची. हे चातुर्यही प्रा. वसन्त कानेटकर यांनी भरपूर दाखविलं आहे. फार्सच्या सरहद्दीला मधून मधून स्पर्श करणाऱ्या या नाटकातल्या विनोदगर्भं उपहासाला सहानुभूतीची झालर सतत लागलेली असल्यामुळे ठिकठिकाणी मोठे बहारीचे रंग उसळले आहेत….
स्त्री पुरुषांच्या आकर्षणाचं आणि प्रीतीचं नाटक जगाच्या रंगभूमीवर सतत चाललेलं आहे आणि चालणार आहे. ते सुरू केव्हा झालं आणि संपणार केव्हा ते सांगता येणार नाही, असा या नाटकाचा संदेश आहे. हा संदेश अशा काही मर्मज्ञ, रसिक, सहानुभूतीपूर्ण, खेळकर क्वचित अवखळ शैलीनं लेखकानं रंगविला आहे की त्याची ही हास्यप्रधान नाट्यकृती सुरू केव्हा झाली आणि केव्हा संपली ते ‘हशा आणि टाळ्यां’च्या जल्लोषात प्रेक्षकांना कळणारसुद्धा नाही!

ISBN: 978-81-7185-020-4

Number of pages: 124

Language: Marathi

Cover: Hardbound

Year of Publication: 2016