Vinda Karandikar (विंदा करंदीकर) : Swedaganga (स्वेदगंगा)
… स्वेदगंगा या संग्रहातील ‘स्वेदगंगा’ ही करंदीकरांची गाजलेली कविता. श्रमशक्तीचे, कष्टकऱ्यांच्या संघटित शक्तीचे निर्णायक महत्त्व सांगणारी व समूहनिष्ठा व्यक्त करणारी ही कविता आहे. १९४४ मधील ही कविता मार्क्सवादी विचारांच्या प्रभावातून निर्माण झाली आहे हे स्पष्टच आहे. “‘स्वेदगंगा’ ही माझी सुरुवातीची एक गाजलेली कविता. ती मार्क्सिस्ट आहे. मी कम्युनिस्ट पार्टीचा मेंबर कधीच नव्हतो पण पुढे अमरशेखनं मला असं सांगितलं की, पार्टीच्या प्रत्येक मेंबरनं ती वाचावी असं एक फर्मान निघालं होतं.’ हे या कवितेविषयीचे करंदीकरांचेच उद्गार आहेत. (संवाद-संपा. विजया राजाध्यक्ष) ‘स्वेदगंगा’ या संग्रहात अशी मार्क्सवादी जाणीव व्यक्त करणाऱ्या इतरही काही कविता दाखविता येतात. या सर्व कविता १९४५ पूर्वीच्या आहेत.
…या अशा कवितांच्या आधारे या काळातील करंदीकरांच्या कवितेतील सामाजिक जाणीव मार्क्सवादी आहे असा निष्कर्ष कोणी काढू पाहील तर ते तेवढेसे खरे ठरणार नाही. कारण ‘स्वेदगंगा’ याच संग्रहात ‘विजयी भारत’, ‘संजीवनी मंत्र’, ‘प्रार्थना’ यांसारख्या ज्या कविता आल्या आहेत त्यांतून व्यक्त होणाऱ्या सामाजिक जाणिवेचा संबंध मार्क्सवादापेक्षा राष्ट्रीय स्वातंत्र्याची आकांक्षा व राष्ट्रीय चळवळ यांच्याशी आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्याची ही आकांक्षा मार्क्सवादाशी विसंगत आहे असा याचा अर्थ नाही. परंतु करंदीकरांच्या अशा कवितांमध्ये येणारे दृष्टान्त व कवितांमधील आवाहनाचा सूर ज्याला राष्ट्रवादी म्हणावे अशा वृत्तीशी जुळणारे आहेत…
दिगंबर पाध्ये
ललित, एप्रिल २००६
ISBN : 978-81-7185-113-3
Publisher : Popular Prakashan Pvt. Ltd
Language: Marathi
Number of page’s : 220
Year of Publication : 4th Edition 2026





