शोध कवितेचा : मंगेश पाडगावकर 

250.00 Original price was: ₹250.00.200.00Current price is: ₹200.00.

Non-Fiction

Shodh Kavitecha (शोध कवितेचा) – Mangesh Padgaonkar (मंगेश पाडगावकर)

स्वतःच्या लेखनाकडे तटस्थपणे पाहत त्याविषयी लिहिणे ही लेखकासाठी सर्वांत कठीण गोष्ट. त्यातही आपल्या लेखनामागच्या प्रेरणा, निर्मितीप्रक्रिया, साहित्यकृतींचा आस्वाद यांविषयी सविस्तर लिहिणे फारच थोड्यांना जमले आहे. मंगेश पाडगांवकरांनी मात्र आपली कविता, आस्वाद प्रक्रिया, लेखक व रसिक यांच्यातले नाते अशा अनेक विषयांवर वेळोवेळी लेखन केले. या लेखांचे संकलन ‘शोध कवितेचा’ या पुस्तकात करण्यात आले आहे. एक कवी म्हणून झालेली मंगेश पाडगांवकरांची जडणघडण या लेखांमधून लक्षात येऊ शकते.
‘आपल्या काव्यनिर्मितीच्या तळाशी आत्मशोध असतो,’ असे मंगेश पाडगांवकर नेहमीच म्हणतात. गेली साठ-पासष्ट वर्षे त्यांचा हा शोध चालू आहे. या प्रवासात वेळोवेळी त्यांना जे गवसले, ते या लेखांच्या रूपाने ते मांडत गेले, म्हणूनच हा शोध कवितेचा. हे लेख खरेतर एकटाकी पुस्तकासाठी म्हणून लिहिलेले नाहीत. साधारणपणे १९६० ते २०१० या पन्नास वर्षांच्या काळात नैमित्तिक रूपाने केलेले हे लेखन आहे. असे असूनही मंगेश पाडगांवकरांच्या साहित्यनिर्मितीविषयीच्या निष्ठा, त्यामागचे तत्त्व यांत तसूभरही फरक पडलेला नाही हे या लेखनामधून जाणवते.

ISBN: 978-81-7185-729-6

Number of pages: 190

Language: Marathi

Cover: Hardbound

Year of Publication: 2011