संध्यामग्न पुरुषाची लक्षणे) – ग्रेस

400.00 Original price was: ₹400.00.320.00Current price is: ₹320.00.
Sold out

Out of stock

Sandhyamagna Purushachi Lakshane (संध्यामग्न पुरुषाची लक्षणे) – Grace (ग्रेस)

चर्चबेल व मितवानंतर आता संध्यामन पुरुषाची लक्षणे हा कवी ग्रेस यांचा तिसरा ललितबंध-संग्रह. आत्मपर अनुभूतीला अतिशय मनःपूर्वक, निसर्गदत्त, दैवी शैलीचाच साज चढवून घडविलेले हे बंध सरळ संवेदनेला भिडून वाचकाच्या जाणिवेची अंतर्व्यवस्था उलटसुलट करून टाकतात. कविता, गद्य आणि चित्रीकरण या तिन्ही कलांची एक एककेंद्री भिंगरी तयार होते व वाचकाला गतिमग्न करून टाकते. शीर्षकापासून शेवटापर्यंत प्रत्येक बंध म्हणजे कवीने संवेदनाविश्वाला दिलेली गतिमान धडक.

स्त्री-पुरुष संबंधांची गुंफण, तिची जटिलता व गुंतवळ आणि या संबंधांची आधुनिक विज्ञानयुगातही सुटता न सुटणारी आदिम प्रेरणांची निरगाठ ग्रेस जशीच्या तशी – अजिबात उलगडण्याचा वृथा प्रयत्न न करता प्रतीकात्मकतेने मांडतात तेव्हा कल्पनाशक्तीच्या आरासयुक्त मांडवात कविप्रतिभेचा उत्सव साजरा होतो. कवि, लेखकाबरोबर वाचकही या उत्सवाचा अध्वयं होऊन जातो. उरते ती फक्त अनुभूतीची लय आणि संवेदनांची दूर दूर पसरत जाणारी झांज……

ISBN: 978-81-7185-579-7

Number of pages: 368

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 2000