Govind Purushottam Deshpande (गोविंद पुरुषोत्तम देशपांडे) – Shevatacha Dis (शेवटचा दिस)
साहित्यक्षेत्रात नाटककार आणि निबंधकार म्हणून गोविंद पुरुषोत्तम देशपांडे प्रसिद्ध आहेत. त्यांचे ‘शेवटचा दिस’ हे नाटक बुद्धिवादी व ध्येयनिष्ठ राजकारण करणाऱ्या गटांमधील प्रेम, स्पर्धा, संपत्ती, असूया अशा विविध मानवी विकारांचे चित्रण करणारे. एका बाजूला कर्मसिद्धांताचा विचार तर दुसऱ्या बाजूला ‘मॉडर्न स्टेट’चे विश्लेषण. डाव्या संघटनेची निर्णयपद्धती आणि कार्यशैली तिच्या अंतर्गत काम करणाऱ्या स्त्री-पुरुषांचे परस्परसंबंध अशा एरव्ही नाटकाचा विषय न होणाऱ्या गोष्टी नाट्यमय रीतीने या नाटकात येतात. साम्यवाद्यांतील रक्तपाती दहशतवादाचे राजकारण करणारा गट आणि त्या गटाच्या अंतर्गत चाललेले दुसरे राजकारण कथानकाच्या केंद्रस्थानी आहे. संतसाहित्याचे गाढे अभ्यासक आणि समीक्षक डॉ. सदानंद मोरे यांची प्रस्तावना या नाटकाचे आणि गो. पु. देशपांडे यांच्या लेखनसामर्थ्याचे महत्त्व स्पष्ट करते.
ISBN: 978-81-7185-916-0
Number of pages: 76
Language: Marathi
Cover: Paperback
Year of Publication: 2010