रायगडाला जेव्हा जाग येते : वसंत कानेटकर

175.00 Original price was: ₹175.00.140.00Current price is: ₹140.00.
Category:

Raygadala Jevha Jaag Yete (रायगडाला जेव्हा जाग येते) – Vasant kanetkar (वसंत कानेटकर)

‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे एक ऐतिहासिक नाटक. ऐतिहासिक एवढ्याच अर्थाने की त्यातली नाट्यवस्तू इतिहासातून कोरून काढलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज शंभूराजे ही मराठी मनांची लाडकी दैवते. पण छत्रपतींच्या जीवनातील शेवटची चार वर्षे न्याहाळत असताना या थोर पितापुत्रांच्या आयुष्यात ज्या घडामोडी घडल्या तिथेच काळपुरुषाने एका महान शोकांतिकेचा घाट निर्माण करून ठेवला आहे असे दिसते; आणि ध्यानात येते की अवतारतुल्य कार्य करणारी पितापुत्रांची ही जोडी म्हणजे अखेर ‘माणसे’च होती. त्यांच्या व्यक्तिमत्वांतून आणि विविधरंगी कर्तृत्वातून माणूस शोधण्याचा हा एक हृदयस्पर्शी आणि मराठी नाट्यसृष्टीत जवळ जवळ पहिलाच प्रयोग.

ISBN: 978-81-7185-035-8

No. Of Pages: 112

Year Of Publication: 2022

Weight 472 kg
Dimensions 21.59 × 13.97 × 0.6 cm