मेलेल्या लेखकांच्या चौकशीचे प्रकरण : मकरंद साठे

350.00 Original price was: ₹350.00.280.00Current price is: ₹280.00.

Melelya Lekhakanchya Chaukashiche Prakaran (मेलेल्या लेखकांच्या चौकशीचे प्रकरण) – Makrand Sathe (मकरंद साठे)

आजवर अनेक पाश्चात्त्य आणि भारतीय तत्त्वचिंतकांनी ‘मी’, ‘स्व’ यांबद्दल महत्त्वाची मांडणी केलेली आहे. त्यांच्या एकंदर तत्त्वविचारातील तो असा घटक होता, ज्याचा विचार सामाजिक-राजकीय वास्तव, मानवी अस्तित्वविषयक प्रश्न, नैतिक मूल्यव्यवस्था, भावनिक प्रेरणाविश्व अशा व्यापक अवकाशावर पसरलेला होता. अशा काही विचारवंतांचे ‘मी कोण’बद्दलचे काही विचार समकालीन राजकीय संदर्भात या कादंबरीत मांडण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. या कादंबरीत लेखकाने उपस्थित केलेला प्रश्न सोपा नाही, या कोड्याला एकाच एक उत्तरही नाही. पण या कोड्याशी झुंजताना लेखकाला जे समाधान मिळालं, जो आनंद मिळाला तसाच आनंद कदाचित वाचकांनाही मिळेल.

ISBN: 978-81-948714-9-1

No. Of Pages: 184

Year Of Publication: 2021