Bali (बलि) : Girish Karnad / Tr. Saroj Deshpande (गिरीश कार्नाड / अनु. सरोज देशपांडे)
वैदिक धर्मातील यज्ञात दिल्या जाणाऱ्या पशुबलीला जैन धर्माने विरोध केला. त्यांच्या मते प्रत्यक्ष हिंसाच नव्हे तर हिंसेचा अभिप्रायदेखील अमानुष आहे व त्यामुळे मनुष्य म्हणून जगण्याची नैतिक बैठक नष्ट होते.
या भूमिकेमुळे असा प्रश्न निर्माण होतो की जर हिंसेचा अभिप्राय हाही प्रत्यक्ष हिंसेइतकाच दोषास्पद असेल, आयुष्यात कधीही खरोखर न केलेले कृत्य करण्याच्या नुसत्या कल्पनेमुळे माणसावर जर त्या कृत्याचे नैतिक उत्तरदायित्व येत असेल तर माणसाची एका आत्ममग्न, एकलकोंड्या विश्वात कोंडी होणार नाही का? त्याचे अस्तित्व एक भयाण, मोक्ष किंवा निर्वाणाची कुठलीही आशा नसलेले, अपराध भावनेने भरलेले अस्तित्व बनणार नाही का ?
याच प्रश्नांचा मागोवा या नाटकात कार्नाडांनी घेतला आहे.
ISBN: 979-81-7185-919-1
Number of pages: 68
Language: Marathi
Year of Publication: 2007