तेलाशिवाय शाकाहारी स्वयंपाक / संजीव कपूर (मराठी आवृत्ती)

275.00 Original price was: ₹275.00.192.50Current price is: ₹192.50.

Telashivay Shakahari Swayampak / Sanjeev Kapoorv (No-Oil Vegetarian Cooking)

स्वयंपाकातला तेलाचा नकोइतका वापर म्हणजे असमतोल आहाराला, वेगवेगळ्या आजारांना आणि पर्यायाने हृदयविकारांमुळे ओढवलेल्या अकाली मृत्यूला निमंत्रणच!

आरोग्यास हानीकारक अशा आधुनिक जीवन-शैलीबद्दल वाटणाऱ्या चिंतेतूनच पाककला तज्ज्ञ संजीव कपूर घरगुती पद्धतीच्या जेवणाचे कट्टर पुरस्कर्ते बनले आहेत. म्हणूनच त्यांनी आता ह्या अतिरिक्त तेलातुपाचा वापर टाळलेल्या पाककृतींद्वारे शरीराला हानीकारक अशा कोलेस्टेरॉल, लिपिड्स, मेद अशा गोष्टींचा समाचार घ्यायचा ठरविले आहे. ह्या खास तयार केलेल्या पाककृती आपल्याला फक्त तेलाच्या प्रमाणावरच नव्हे, तर एकंदर आपल्या आयुष्यावरच नियंत्रण ठेवायला मदत करतील.

सध्याचे हे तणावपूर्ण आयुष्य आपल्याला जणू आक्रोश करून सांगत आहे की आहार घेताना आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करायला लागा. पौष्टिक, कमी उष्माकांच्या, कोलेस्टेरॉल न वाढवणाऱ्या, तरीही चविष्ट आणि सोप्या पाककृती तयार करण्याचं आव्हान संजीव कपूर यांनी या पुस्तकात लीलया पेललं आहे. भरपूर संशोधन करून आणि खास त्यांच्या अशा वैशिष्ट्यपूर्ण चवीचा स्पर्श झालेल्या ह्या पाककृती तुमचे आयुष्य बदलून टाकतील.

ह्या आरोग्यपूर्ण पाककृतींमध्ये गरमागरम सूप पासून, चविष्ट स्टार्टर्स आणि मुख्य जेवणातील अगदी नावीन्यपूर्ण अशा पदार्थांचा समावेश आहे. लाल सिमला मिरच्यांचे सूप, बाल्सेमिक व्हिनेगरमधील मश्रूम्स, सौंफिया टिक्का, टॅब्युल्ह स्टफ्ड टोमॅटोज, भाज्यांची हिरवीगार थाई करी अशा नानाविध पदार्थांचा आस्वाद तुम्हांला पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटेल.

खास शाकाहारी व्यक्तींसाठी संजीव कपूर ह्यांनी तेलाशिवाय स्वयंपाकाची ही शाकाहारी आवृत्ती तयार केली आहे. ह्यामध्ये आधीच्या ‘तेलाशिवाय स्वयंपाक’ मधील सर्व शाकाहारी पाककृती तर आहेतच शिवाय अनेक नवीन पाककृतींचाही समावेश आहे.

चला तर मग… संजीव कपूर ह्यांनी आपल्या समोर पेश केलेल्या ह्या पाककृतींच्या साहाय्याने आपल्या स्वयंपाकघरात आणि जीवनात पुन्हा एकदा शरीरस्वास्थ्याला निमंत्रित करूया.

 

Weight 0.700 kg
Dimensions 20 × 25.5 × 1.5 cm
ISBN

81-7185-908-9

Language

Marathi Edition

Pages

132

Binding

Hardbound with Jacket

Year of Publication

2007