Chhota Giraffe / Yasmin Temizaarbeki Eldirmaz / Marathi Tr.: Usha Mehta
यास्मिन तेमिझारबेकी इल्दिरमझ हिने पर्यावरण अभियांत्रिकी विषयाची पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर विमेन्स स्टडीज या विषयातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. तिची पहिली कादंबरी २००५ मध्ये प्रकाशित झाली. तिने अनेक वर्ष चित्रपट महोत्सवांमध्ये काम केलं आहे. सध्या आपल्या कुटुंबासह ती इस्तंबूलमध्ये राहते.
एजे झेबरने आपल्या आईवडिलांकडूनच चित्रकलेचे धडे घेतले. लहानपणापासून निरनिराळ्या पुस्तकांतली चित्र पाहून, कार्टून पाहून तिला चित्रकलेची आवड निर्माण झाली. बालिकेसिर फाइन आर्टस् हायस्कूलमधून तिने चित्रकलेचा अभ्यास केला.
स्वतः कवयित्री, लेखिका असलेल्या उषा मेहता यांनी मुलांसाठीही लेखन केलं आहे. ‘काजव्याचा कंदील, डोगा डुंगा डोगा’ या मुलांसाठी लिहिलेल्या कवितांना बालवाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. अँटोनी द सेंट-एक्सयूपेरी यांच्या ‘द लिटिल प्रिन्स’ या जगप्रसिद्ध फ्रेंच कादंबरीचा मराठी अनुवाद त्यांनी केला आहे. कविता, गीत रचना, गद्य लेखन, बालसाहित्य यांबरोबरच चित्रकला आणि समाजकार्य याही क्षेत्रात त्या कार्यरत आहेत.
छोटा जिराफ पानांपर्यंत पोहोचेल का?
अंगावर चांदण्यांसारखे ठिपके असलेला जिराफ जेमतेम झाडाखाली पडलेल्या पानांपर्यंत पोहोचू शकतो. स्वतःच्या कुटुंबियांमध्ये व मित्रांमध्ये तो सर्वात ठेंगणा असतो. खरोखरीच तो आकाराने फारच लहान असल्यामुळे त्याला वाईट वाटत असे.
त्याला लवकर लवकर मोठे व्हायचे होते म्हणून रोज आपली उंची मोजायचे त्याने ठरवले. बरेच दिवस गेले तरी त्याची उंची काही आधीच्या खुणेपेक्षा वाढली नव्हती.
ज्या मुलांना खूप लवकर मोठे व्हावेसे वाटत असते अशा सर्व मुलांसाठी ही छोट्या जिराफाची गोष्ट!





