गुलामराजा : बबन मिंडे

550.00 Original price was: ₹550.00.450.00Current price is: ₹450.00.
Sold out

Out of stock

Gulamraja

पहिल्या महायुद्धामुळे जगात मोठ्या प्रमाणात आर्थिक बदल झाले. उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी ब्रिटिश सरकारने भारतात औद्योगिक आयोगाची स्थापना केली. त्यामुळे भांडवलदारांची

ताकद्‌ वाढली. त्यांनी उद्योगवाढीसाठी राजकारणात रस घ्यायला सुरुवात केली. ब्रिटिश सरकारशी जुळवून घेत आपला उद्योगधंदा वाढवत राहिले. कामगारांची गरज असणाऱ्या या उद्योगपतींनी

समाजवादाशी फारकत घेत साम्राज्यवादाशी जुळवून घेतले. या नव्याने उदयास आलेल्या भांडवलदार वर्गाची प्रतिनिधी म्हणजे

टाटा कंपनी. टाटांचे सरकारशी आणि राजकीय पुढाऱ्यांशी असलेले संबंध त्यांना उपकारकच ठरले.

मुळशी सत्याग्रह धरणाच्या विरोधातला भारतातील पहिला लढा. त्याला आता शंभर वर्ष॑ झाली. अहिंसक मार्गाने अशा

स्वरूपाचा एवढा दीर्घ काळ चालणारा हा जगातील पहिला लढा. तो राजकारणापासून अलिप्त राहिला नाही. जहाल आणि मवाळ,

ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर अशा वादांत हा सत्याग्रह अडकला. त्याला वर्गयुद्धाचे स्वरूप प्राप्त झाले. त्याचे चित्र भांडवलदार विरुद्ध

शेतकरी असे दिसू लागले.

पुढे शंभर वर्षांत भारतात शेतकरीवर्ग कमी होत गेला आणि कामगारवर्ग वाढत गेला. भांडवलदारांच्या मजींवर जगणारा गुलाम

झाला. भारतातील शेतकऱ्यांचा मागील शंभर सव्वाशे वर्षांतील हा प्रवास म्हणजे मुळशी सत्याग्रहाच्या पार्श्वभूमीवरील गुलामराजा ही

कथा. टाटा कंपनीचे साम्राज्य जगभर वाढले; पण ज्यांच्या जमिनीवरून त्याची सुरुवात झाली ते धरणग्रस्त शेतकरी आज कुठें

आहेत? ही कथा वाचल्यावर हा प्रश्‍न पडल्याशिवाय राहत नाही.

ISBN: 978-81-955127-5-1

No. Of Pages: 400

Year Of Publication: 2022

Weight 470 kg
Dimensions 21.59 × 13.97 × 1.6 cm