Garbharesheem (गर्भरेशीम) : Indira Sant (इंदिरा संत)
मराठी कवितेच्या इतिहासात ‘विशुद्ध भावकविता लिहिणार्या कवयित्री’ म्हणून विख्यात असणाऱ्या कवयित्री इंदिरा संत ह्यांचा ‘गर्भरेशीम’ हा कविता संग्रह १९८२ साली प्रसिद्ध झाला आणि १९८४ साली या संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. शब्दप्रतिमा योजून इंदिराबाई त्यांच्या कवितेला बांध घालतात आणि त्या अनुभवाला मूर्त करतात. शाश्वत व सनातन असलेल्या सृष्टीतील प्रतिमांचा वापर करत आशय-अभिव्यक्तीचा एक सुरम्य आविष्कार त्यांच्या कवितेतून सादर होतो.
ISBN: 978-81-7185-779-1
Number of pages: 136
Language: Marathi
Year of Publication: Reprint 2024





