कोरडे नक्षत्र : प्रकाश होळकर

60.00

Fiction

Category:

Korade Nakshatra (कोरडे नक्षत्र) – Prakash Holkar (प्रकाश होळकर)

कोरडे नक्षत्र’ या कवितासंग्रहातून ग्रामीण जीवनाचे एक वेगळे रूप वाचकांपुढे येते आहे. गेल्या काही वर्षांत ग्रामीण वास्तव बदलते आहे. नद्या कोरड्या होताहेत, विहिरी आटताहेत, जमिनीची ओल कमी होते आहे. पाण्याच्या शोधात पाखरे दूरदूर जात आहेत. रानाला उन्हाच्या झळा झोंबतात आणि पेरलेल्या दाण्याला कोंब फुटण्याआधीच माती जाळून टाकते. ‘दुष्काळाचा नाग’ समोर फणा काढून उभा राहतो, शिवारे जळत राहतात, पाठीला पोट लावून कसेबसे जगणाऱ्या माणसांच्या ‘काळजाखालचा अंधार’ तेवढा वाढत जातो. या कठीण होत चाललेल्या जगण्याची असहाय वेदना जातिवंतपणे व्यक्त करणारा हा संग्रह. प्रकाश होळकर यांची ही कविता शेतकऱ्याच्या दुःखाशी जन्मनाळेने बांधलेली आहे. शेतकऱ्याच्या ‘आतड्याचा पीळ’ ती व्यक्त करते. त्याच ‘मातीत जन्मून’ त्याच मातीत ‘नांदणारा’, देहावर ‘मातीचे फोड’ वागवीत जगणारा, मातीचे वेड असलेला हा कवी, शेतकऱ्याच्या जीवनाची दुःखे आणि स्वप्ने शेतीतून उगवून आलेल्या अस्सल भाषेतून व्यक्त करतो. ‘भरू दे यंदा मृगाचं आभाळ, नावाचा तुझ्या यळकोट करील..’ ही काळजातून आलेली हाक, आणि ‘डोळ्यांदेखत शिवाराचा करपा होत जातो / आला दिवस पाखरांची पखवळ घेऊन येतो’ ही काळजाची कासावीस अशी थेटपणे व्यक्त करणारा हा संग्रह या कवितेमागच्या अनुभूतीच्या अस्सलपणाचा प्रत्यय ओळीओळीतून देत राहतो.
– प्रभा गणोरकर

ISBN: 81-7185-749-3

Number of pages: 72

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 2005

Weight 0.80 kg
Dimensions 12.7 × 7.5 cm