Kundha (कुंधा) – Ashok Kautik Koli (अशोक कौतिक कोळी)
‘कुंधा’ ही कादंबरी ग्रामीण शेतीला ग्रसणाऱ्या संकटाची भीषण कहाणी आहे. कुंधा म्हणजे पिकांच्या पाळामुळांची नाकेबंदी करणारे, शेतकऱ्याला नामोहरम करणारे एक प्रकारचे तण. ग्रामीण शेतीच्या दुरवस्थेचे कुंधा हे एक प्रतिक आहे. शेतकऱ्यांच्या जीवावर उठणाऱ्या, त्यांना हमालांपेक्षा निपत्तर करून सोडणाऱ्या शेठ सावकारांच्या व बँक-पतपेढ्याच्या आणि राजकीय पाठीराख्यांच्या तालावर नाचायचे शेतकऱ्यांनी सोडून द्यावे, त्यासाठी आधी स्वतः सक्षम व्हावे आणि तमाम हितशत्रूंची पाळेमुळे उखडून फेकून द्यावीत असे रास्त विचार देणारी ही कादंबरी देशातील शेती व शेताकरी यांच्या भावितव्याबद्दल प्रश्नचिन्ह असणाऱ्या आजच्या एका ज्वलन्त समस्येला हात घालणारी आहे.
विषयाची सखोलता, गांभीर्य अधिक प्रभावी करणारी भाषा या कादंबरीला एक वेगळीच धार आणते. खानदेशी बोलीभाषेतील अनेक अर्थपूर्ण व लयदार शब्द, वाक्प्रचार आणि म्हणी या कादंबरीतील संवादांतून व वर्णनांतून प्रथमच मराठी साहित्यसृष्टीत हजेरी लावताना वाचकाला आढळतील. कुंधा उपटून फेकल्याखेरीज वावर पिकणार नाही हे परंपरेने शेतकऱ्याला शिकवलेले व्यवहारज्ञानच त्याला आत्ताच्या संकटातूनही सहीसलामत बाहेर काढल्या वाचून राहणार नाही, हे प्रमुख सूत्र या कादंबरीतून वाचकांसमोर येते.
ISBN: 978-81-7185-887-3
Number of pages: 222
Language: Marathi
Cover: Paperback
Year of Publication: 2010