Kawale Udale Swami (कावळे उडाले स्वामी) – Grace (ग्रेस)
कावळे उडाले स्वामी’ हा कवी ग्रेस यांचा एक अनवट शैलीतला लेखसंग्रह. ‘सामना’ या वृत्तपत्राच्या ‘फुलोरा’ पुरवणीमधून ग्रेस यांनी जवळजवळ दोन वर्षं ‘चंद्रउदयिनी वेळा’ आणि ‘गणमात्रांचे गणगोत’ ही दोनसदरं लिहिली. त्यांचे संकलन म्हणजे ‘कावळे उडाले स्वामी’ हा लेखसंग्रह. यातील लेख वाचनानंद देतातच पण ग्रेस यांच्या अनवट शैलीचा जागोजागी प्रत्यय आणून देतात. अनेक वेळा ग्रेस अमूर्त विचाराला शब्द आणि प्रतिमा यांच्या मदतीने मूर्तरूप देतात. ते विचार, भावना, मनातील खळबळ, आवेग हे सारंच जोरकसपणे मांडतात. या लेखांमध्ये लौकिकाच्या पलीकडल्या गोष्टी ग्रेस ज्या सहजपणे टिपतात आणि प्रत्ययकारीपणे भाषेत मांडतात, ते थक्क करणारं आहे.
ISBN: 978-81-7185-888-0
Number of pages: 220
Language: Marathi
Cover: Paperback
Year of Publication: 2010