कळ – श्याम मनोहर

425.00 Original price was: ₹425.00.340.00Current price is: ₹340.00.

Fiction

29 in stock

Kal (कळ) – Shyam Manohar (श्याम मनोहर)

फॉर्मच्या पातळीवर अनेक कथात्म संरचनांनी जोडलेली श्याम मनोहरांची ही कादंबरी विविध भाषिक आणि वैचारिक वळणे घेत अनेक आशयसूत्रांना स्पर्श करते आणि समकालीन मराठी समाजावरील एका अर्थपूर्ण भाष्याचे स्वरूप धारण करते. सर्जनशीलता हरवलेल्या, शोध घेण्याचा इतिहास गमावलेल्या हासप्राप्त समाजात ज्ञान, राजकारण, अध्यात्म, स्त्रीपुरुषसंबंध, भाषा आणि साहित्य या सर्वच व्यवस्थांची आणि त्यासंदर्भातील मूल्यभानाची काय अवस्था होते, याचे भेदक आकलन ‘कळ’मध्ये जागोजागी दिसून येते. लेखकशून्यतेच्या सूत्रापासून प्रारंभ करून मोटरगॅरेजवाल्याच्या लेखनकृतीने संपणारी ही कादंबरी केवळ सामाजिक-नैतिक स्वरूपाचे प्रश्न न उभे करता एकूण ज्ञानव्यवस्था आणि साहित्यप्रकार म्हणून कादंबरी यांतील परस्परसंबंधांच्या आकलनाला एक नवीन दिशा देते.

— चंद्रशेखर जहागीरदार

ISBN: 978-81-7185-957-3

Number of pages: 316

Year of Publication: 1996, 3rd Ed. 2023