Olya Veluchi Basari (ओल्या वेळूची बासरी) – Grace (ग्रेस)
ओल्या वेळूची बासरी’ हा सर्वांगसुंदर ललितलेखसंग्रह ग्रेस यांच्या प्रतिभेची पुन्हा एकदा साक्ष देणारा ठरला आहे. ग्रेस यांच्यातील लेखक समजून घेण्याच्या दृष्टीने हा संग्रह महत्त्वाचा आहे. आपल्या निर्मितीप्रक्रियेमागची प्रेरणा, लेखनातील बलस्थाने, लेखनप्रक्रियेविषयीचे चिंतन आणि आत्मपर जाणिवांचा शोध घेत लिहिलेले या संग्रहातले लेख ग्रेस यांच्या उत्कट मनःस्थितीचे चित्रण करणारे आहेत. चित्रकार रविमुकुल यांनी केलेली या पुस्तकाची मांडणी, त्यासाठी त्यांनी काढलेली ग्रेस यांची रेखाचित्रे, आणि मुखपृष्ठावरचे जलरंगातले चित्र हीदेखील या संग्रहाची वैशिष्ट्ये आहेत, लेखनाचा आशय अधोरेखित करणारी आहेत.
ISBN: 978-81-7185-625-1
Number of pages: 200
Language: Marathi
Cover: Paperback
Year of Publication: 2019