Aisa Ga Mee Brahma (ऐसा गा मी ब्रह्म!) – Narayan Surve (नारायण सुर्वे)
अनेक मर्यादांनी ग्रासलेल्या वाङ्मयाला तोचतोचपणा यावा, त्याच्या चतुःसीमांचा संकोच व्हावा, यात नवल नाही. वाङ्मयनिर्मितीच्या मीमांसा कोणत्याही आणि कशाही असोत, त्याचा विस्तार वाढायला हवा, समाजाच्या सर्व विभागांतून त्याचे पोषण व्हावे आणि जीवनाच्या साया सरहद्दींपर्यंत त्याचा संचार व्हावा, याबद्दल दुमत होऊ नये. सध्या असे प्रयत्न होत आहेत यात शंका नाही. बंद असलेले अनेक दरवाजे उघडत आहेत. अडसर निखळून पडत आहेत. नारायण सुर्वे हे कामगारजीवनाशी केवळ समरस झालेले नव्हे, तर ते जीवन प्रत्यक्षात अनुभवणारे कवी आहेत. नारायण सुर्वे यांनी पुस्तकांच्या कपाटात आपली स्फूर्तिस्थाने शोधलेली नाहीत. सभोवारच्या परिसरात ते काही श्रद्धा जागत्या ठेवून जगत आहेत आणि त्यांतूनच त्यांनी काव्याचा शोध घेतला आहे. त्यांची बरीचशी कविता लढाऊ वृत्तीची, समाजक्रांतीची उपासना करणारी, नव्या आनंदभुवनाचे स्वप्न पाहणारी आहे. प्रामाणिकपणा आणि उत्कटता ही सत्काव्याची आधारतत्त्वे. सुर्वे यांच्याजवळ या दोन्ही गोष्टी आहेत हे त्यांची कविता वाचणाऱ्यांच्या सहज लक्षात येईल.
ISBN: 978-81-7185-033-4
No. Of Pages: 75
Year Of Publication: 1962