सुर्वे : नारायण सुर्वे यांची समग्र कविता

895.00 Original price was: ₹895.00.716.00Current price is: ₹716.00.

Surve : Narayan Surve yanchi Samagra Kavita /  Narayan Surve

केवळ चार छोटेखानी कवितासंग्रहांमधल्या एकशे पंचेचाळीस कविता नावावर असूनही नारायण सुर्वे यांना मराठी काव्यक्षेत्रात जो लौकिक मिळाला त्यामागची कारणे जाणून घेण्यासाठी त्यांच्या सर्व कविता एकत्रितपणे सलग वाचणे गरजेचे आहे. या श्रेयस आवृत्तीमुळे रसिकांना ही संधी मिळत आहे. प्रा. दिगंबर पाध्ये यांची कवितेकडे पाहण्याची नवीन दृष्टी देणारी चिकित्सक प्रस्तावना आणि नारायण सुर्वे यांनी पूर्वी ‘सनद’ संग्रहासाठी लिहिलेले आणि आता या पुस्तकात समाविष्ट केलेले आपल्या कवितेविषयीचे मनोगत यांमुळे सुर्वे यांची कविता समजून घेणे अधिक सोपे झाले आहे. पुस्तकाच्या शेवटी सुर्वे यांच्या कवितेवरच्या समीक्षेची सूची दिल्यामुळे अभ्यासकांचीही सोय झाली आहे. या पुस्तकात नारायण सुर्वे यांच्या प्रकाशित सर्व संग्रहातल्या कविता असल्या तरी त्यांनी अनुवादित केलेल्या कवितांचा समावेश मात्र यात केलेला नाही.

 

 

Weight 280 kg
Dimensions 21.59 × 13.97 × 2 cm
लेखक

नारायण सुर्वे

पाने

326

ISBN

978-81-7185-754-8

पहिली आवृत्ती

2011

बांधणी

हार्डबाऊंड