Vijay Tendulkar (विजय तेंडुलकर) : Samagra Ekankika : Bhag 1 (समग्र एकांकिका : भाग १)
समग्र एकांकिका : भाग – १
विजय तेंडुलकर
विजय तेंडुलकरांच्या नाटकांत, एकांकिकांत नाट्याशयाबरोबरच तंत्र व शैलीमध्ये वेगळेपणा आणणारी, पारंपरिक नाट्यतंत्राची मोडतोड करून नावीन्य शोधणारी, विषयातला वेगळेपणा पोसणारी, सुंदरतेबरोबरच कुरूपतेच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी त्यांची प्रतिभा निरनिराळे प्रयोग करीत परखड वास्तव आपल्यासमोर आणत राहते.
अशा कलाकृतींच्या शोधात असलेल्या कलावंताना, नाट्यसंस्थांना, अभ्यासू-जिज्ञासू वाचकांना सातत्याने नवीन अनुभव देणाऱ्या या एकांकिका तीन भागांत एकत्रित मिळण्याचा योग आला आहे.
पहिल्या भागात गाजलेल्या ‘रात्र’ सारख्या श्रुतिकांचा आणि नाद माध्यमातील तांत्रिक अंगांची, संमिश्र आवाजाची साथ-सोबत घेऊन येणाऱ्या ‘झपूर्झा’ सारख्या मानसिक गुंतागुंतीच्या, ताण-तणावदार आणि परिस्थितीजन्य समस्याप्रधानता दर्शविणाऱ्या, गंभीर अशा एकांकिकांचा समावेश केला आहे.
या भागातील एकांकिका
काळोख
ओळख
रात्र
झपूर्झा
चार दिवस
स्वगत
… दरद न जाने कौन
वैऱ्यांची रात्र
मादी
ISBN : 978-81-7185-733-3
Number of pages : 182
Publisher : Popular Prakashan Pvt. Ltd.
Language: Marathi
Year of Publication : Reprint 2025