Shivkalin Striyanchya Adhikarkaksha (शिवकालीन स्त्रियांच्या अधिकारकक्षा) – Neelima Bhave (नीलिमा भावे)
अठरावे शतक हे महाराष्ट्राच्या इतिहासात ‘पेशवाई’ म्हणून ओळखले जाते, तर सतरावे शतक हे ‘शिवकाल’ म्हणून ओळखले झाआटे. शिवकाल हा महाराष्ट्राच्या इतिहासातील केवळ एक कालखंड नाही; तर महाराष्ट्राच्या भविष्यकाळावरही आपला प्रभाव कायाम्ठेवत आलेला आणि त्यातून महाराष्ट्राची अस्मिता घडवणारा असा काळाच्या पुढे घेऊन जाणाऱ्या विचारांचा कालखंड आहे.
सतराव्या शतकातील स्त्रियांचे सामाजिक, राजकीय, धार्मिक, व्यावहारिक, कौटुंबिक जीवनातील स्थान काय होते याविषयी नीलिमा भावे यांनी विशेष संशोधन केले. सामाजिक जीवनाच्या कोणत्या क्षेत्रात स्त्रियांना निर्णय देण्याचे व घेण्याचे अधिकार होते, असे अधिकार वापरणाऱ्या वा गाजवणाऱ्या कोण स्त्रिया होत्या, त्यांची धार्मिक, सामाजिक तसेच कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे गुणधर्म कोणते होते यासंबंधी अधिकाधिक माहिती मिळविण्याचा हा प्रयत्न होय. ज्यांच्या कोणत्या न कोणत्या कृत्याची, कर्तृत्वाची व केवळ अस्तित्वाचीही दखल इतिहासाने घेतली अश्या साठ स्त्रियांबद्दल नीलिमा भावे यांनी या पुस्तकात लिहिले आहे, ज्यामुळे इतिहासाच्या अभ्यासकाला एक वेगळी दिशा मिळते.
ISBN: 978-81-966313-4-5
Number of pages: 112
Language: Marathi
Cover: Paperback
Year of Publication: 2010