Parwa
‘निळासावळा’, ‘पारवा’ व ‘हिरवे रावे’ हे जी. ए. यांचे पहिले तीन कथासंग्रह… या साऱ्या कथांतून जी. ए. जीवनाची अस्तित्वमात्रता, त्याची अटळता, त्याची अर्थरहितता, असंबद्धता आणि त्यातील कार्यकारणहीनता हे सारे तर उभे करतातच, पण त्याबरोबरच आपण जिला सहजप्रवृत्ती म्हणतो, वासना किंवा प्रेरणा म्हणतो त्या शक्त्तिने मानव हे जीवन कसे जगू व बदलवू पाहतो याचेही अनन्य दर्शन घडवितात. ‘काकणे’, ‘रात्र झाली गोकुळी’, ‘बळी’, ‘भेट’ अशा जीएंच्या गाजलेल्या कथा या संग्रहात वाचायला मिळतील.
ISBN: 978-81-7185-981-8
No. Of Pages: 168
Year Of Publication: 2019