Navya Wata Shodhanare Kavi (नव्या वाटा शोधणारे कवी) – Sudhir Rasal (सुधीर रसाळ)
या ग्रंथातून साठोत्तरी ‘लघुपत्रिका’ या महत्त्वाच्या वाङ्मयीन चळवळीचे वस्तुनिष्ठ विवेचन करताना त्याचे केवळ समीक्षात्मक मूल्यांकनच नव्हे तर या प्रकारच्या पुढील अभ्यासासाठी एक आदर्श मार्गदर्शक वस्तुपाठ आपल्यासमोर ठेवला आहे. या ग्रंथातील अरुण कोलटकर, मनोहर ओक, भालचंद्र नेमाडे, तुलसी परब, सतीश काळसेकर, वसंत दत्तात्रेय गुर्जर आणि चंद्रकांत पाटील या सातही लघुपत्रिकाकवींच्या समग्र कवितांचा त्यांच्या कालक्रमाने व समकालानुसार वेध घेतला असून या कवींच्या व त्यांच्या कवितांच्या लघुपत्रिका चळवळीतील योगदानाचाही सडेतोड परामर्श प्रस्तुत ग्रंथात घेतलेला आहे.
ISBN: 978-81-966313-5-2
Number of pages: 312
Language: Marathi
Cover: Paperback
Year of Publication: 2024