चर्चबेल : ग्रेस

225.00 Original price was: ₹225.00.180.00Current price is: ₹180.00.

Churchbell

‘संध्याकाळच्या कविता’, ‘राजपुत्र आणि डार्लिंग’ या कवितासंग्रहांमुळे मराठी काव्यरसिकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ग्रेस यांचा हा लघुनिबंधसंग्रह. या संग्रहात आत्मपर आशय असलेले आणि तरीही भावमधुर काव्याची प्रचीती आणून देणारे जवळ जवळ पस्तीस ललित लेख आहेत.

ग्रेसमधला आत्ममग्न, आत्मसुख कवी इथे गद्यातून वाचकांसमोर साकार होताना कवितेचे सर्व विशेष तितक्याच उत्कटतेने, तितक्याच समर्थतेने प्रकट करतो. तुकयाच्या अभंगवाणीवर पोसलेले, रोशनच्या गाण्यांनी समृद्ध झालेले, हॉस्पिटलमधल्या प्रदीर्घ वास्तव्यामुळे मृत्यूविषयी अधिक प्रगल्भ विचार करणारे, माणसामाणसांतील स्वभाववैचित्र्यांवर व व्यक्तिवैशिष्ट्यांवर लोभावून जाणारे, झाडे आणि घोडे यांच्यामुळे वेडावलेले ग्रेसचे कविमन आणि त्यांचे समृद्ध भावविश्व इथे रसिकांसमोर एखाद्या स्वच्छ, नितळ, पारदर्शक जलाशयासारखे पसरलेले आहे. ग्रेसच्या काव्यातील आशयघन दुर्बोधता ‘चर्चबेल’मधील ललितसुगम शैलीमुळे आणि आत्मपर संदर्भामुळे लगेच सुबोध होऊन जाते. म्हणूनच ‘कवी’ ग्रेसचा अभ्यास करताना कुणालाही ‘चर्चबेल’ हाती धरावेच लागेल. ग्रेसचे ललितलेखनही त्यांच्या कवितेइतकेच लोभस आहे हे कुणालाही नाकबूल करता येणार नाही.

ISBN: 978-81-7185-973-3

No. Of Pages: 144

Year Of Publication: 1974

Weight 120 kg
Dimensions 17.78 × 12.07 × 0.6 cm