Viroopika (विरूपिका) – Vinda Karandikar (विंदा करंदीकर)
स्वेदगंगा’, ‘मृद्वंध’, ‘धृपद’ व ‘जातक’ या संग्रहांनंतरचा ‘विरूपिका’ हा विंदांचा पाचवा संग्रह. जीवनातील विविध कुतूहलांचा जाणीवपूर्वक शोध घेणारी, छंद आणि मुक्तछंद या दोन्ही पद्धतींनी भाषेच्या लयीचा वेध घेणारी, संगीत व चित्रकला यांच्या व्यासंगामुळे स्वरांशी संबंधित तालचित्रे निर्माण करणारी; बालगीतांतून संवादात्मक आणि बालमनाचे सूक्ष्मवेधक चित्रण करणारी विंदा करंदीकर यांची कविता व्यापक अशा समाजजीवनाशी एकरूप पावलेली आहे. समाजमनस्क आहे, तशीच ती वैयक्तिक अनुभवांतून आकारलेली आहे.
‘विरूपिका’तून साकारलेली त्यांची कविता म्हणजे त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर… एखादा भावलेला अनुभव, विचार किंवा अवस्था विरूपाच्या आधाराने काव्यरूप झालेली दिसली की ती विरूपिका असते.
अशाप्रकारच्या जीवनातील मूलभूत प्रेरणांशी इमान राखणाऱ्या, त्यातील जाणिवांची समर्थपणे अभिव्यक्ती करणाऱ्या विरूपिकांचा हा संग्रह !
ISBN: 978-81-7185-285-7
Number of pages: 98
Language: Marathi
Cover: Paperback
Year of Publication: 2024