Putting Women First: Grameen Bhagateel Striya Ani Tyanche Aarogya (पुटिंग विमेन फर्स्ट : ग्रामीण भागातील स्त्रिया आणि त्यांचे आरोग्य)
जेव्हा जागतिकीकरण आणि मुक्त आर्थिक व्यवहाराचे वारे भारतीय उपखंडातून वाहू लागले, तेव्हा ग्रामीण कुटुंबे त्यामुळे होणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि व्यक्तिगत परिणामांसाठी तयार नसल्याने भरडली जाऊ लागली. विोषतः शिक्षण, माहिती, साधनसंपत्ती या क्षेत्रांत फार मोठे फरक जाणवू लागले. खाण्यापिण्याच्या सवयी, पोशाखाची पद्धत, माणसांचं दिसणं, वागणं या सगळ्यात बदल झाल्यामुळे जीवनपद्धतीच बदलली आणि या सगळ्याचा परिणाम माणसामाणसांतली नाती, आरोग्य आणि आयुष्यावर होऊ लागला.
राणी बंग यांच्यासारखे डॉक्टर या लोकांच्या जवळून सान्निध्यात असतात आणि त्यांच्याकडून होईल तेवढा जास्तीत जास्त प्रयत्न करून या समाजाभोवती झालेली समस्यांची कोंडी फोडून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. या समस्या म्हणजे लैंगिक संबंधातून पसरणारे रोग, नको असलेले गर्भ, दारूचं व्यसन, तीव्र निराशा, सैल होत चाललेले कौटुंबिक आणि सामाजिक बंध वगैरे वगैरे.
हे पुस्तक आपल्याला ग्रामीण स्त्री-पुरुषांच्या कहाण्या सांगतं. हे स्त्री-पुरुष इतक्या वर्षांत बंगबार्इंच्या दवाखान्यात आलेले. त्यांनी त्यांचे प्रश्न कसे सोडवले, त्यांचे आपापसांतले नातेसंबंध कसे होते, त्यांवर कसा परिणाम झाला नि आजही होतो आहे हे आपल्याला यात वाचायला मिळतं. आणि या कहाण्या वाचत असताना एक सत्य उमगतं की, माणसांचा भूगोल, संस्कृती, वर्ण आणि वर्ग वेगवेगळे असले तरी बऱ्याच समस्या या वैश्विक असतात.
– रूपा चिनाय
ISBN: 978-81-956688-7-8
Number of pages: 400
Year of Publication: 2022