Chintamani : Ek Chirantan Chintan (चिंतामणी : एक चिरंतन चिंतन)

2,000.00 Original price was: ₹2,000.00.1,500.00Current price is: ₹1,500.00.

प्रकाशनपूर्व नोंदणी केल्यास सबंध भारतभर रुपये 1500/- मध्ये घरपोच मिळेल.

Available on: November 13, 2024 at 10:00 am

Chintamani : Ek Chirantan Chintan  ( चिंतामणी : एक चिरंतन चिंतन ) – Shruti Pandit & Shashi Vyas ( श्रुती पंडित आणि शशी व्यास )

व्यासांबरोबर व्यासांच्या बायकोचंही कौतुक करायला पाहिजे. गवयाची बायको म्हणून तिनं आयुष्य काढलं. ते किती खडतर आहे, हे जर सांगायला लागलं तर व्यासांच्या सद्‌गुणांबद्दल जे बोलले ते किती खोटे होते, हे तुमच्या लक्षात येईल.

आपल्या समाजामध्ये नवऱ्याचं मोठेपण काय आहे, हे गात असताना त्याची बायको तोंड उघडत नाही, हे नवऱ्यावरती मोठे उपकार आहेत. आजसुद्धा संध्याकाळी घरी गेल्यावर ‘लोक तुमच्याबद्दल काहीबाही बोलतात,’ असं त्या म्हणतील. पण तुम्ही कसे संतापता, संतापल्यावर काय करता, तांब्या कसा फोडता आणि भाजीत मीठ कमी झाल्यानंतर ताट कसं भिरकावता हा याचा अवतार त्यांनी पाहिलेला आहे. तरीसुद्धा त्यांचा संसार सुरेल कुणी केला असेल तर तो त्यांनीच केलेला आहे. ज्या वेळेला गवयाला दोन वेळचं जेवण निघणं कठीण होतं, अशा काळामध्ये या बायकोनं संसार सावरलेला आहे. तिचे उपकार किती मोठे आहेत. मन्सूर मला सांगत होते, तीस रुपयेसुद्धा यायचे नाहीत. तरीसुद्धा बायकोनं कधी सांगितलं नाही की, या वेळी पैसे कमी आले म्हणून, ज्यांनी असे संसार केले त्या बायकांविषयी आज कृतज्ञता राहिली पाहिजे.

त्यांनीही संगीतकला चालवण्यामध्ये गुप्त दान केलेलं आहे, ते दान फार मोठं आहे. त्यांना ते गुप्त ठेवण्यामध्ये आनंद आहे. म्हणून ते गुप्त ठेवायचं. पण असे प्रसंग येतात की, कुठंतरी ते प्रकट करावं लागतं. म्हणून हे मी आत्ता प्रकट करतो आणि आपली रजा घेतो.

ISBN: 978-81-969198-7-0

Number of pages: 340

Language: Marathi

Cover: Hardbound With Jacket

Year of Publication: 2024