Shridhar Nalini Shantaram Tilve Naik (श्रीधर नलिनी शांताराम तिळवे नाईक) : Margi Ani Deshi (मार्गी आणि देशी)
चौथी नवता’ हा शब्द मी नव्वदीच्या दशकात ऐकलेला. ह्या शब्दाची एकदम भूल पडलेली. ह्या
शब्दाचे प्रणेते होते दस्तुरखुद श्रीधर तिळवे. श्रीधरचे नाव ऐकून होतो. कविता, समीक्षा, सिनेमा,
चित्रकला, फिल्मबाजी, भविष्य पाहणे इत्यादी त्याचे अनेक पैलूही ऐकिवात होते. त्याच्या
वेगळ्या कवितेचाही दबदबा होता. आम्ही गावकोपच्यातली माणसं, कवितेत लुडबुड करत
असलेली. अशातच हा ‘चौथी नवता’ शब्द अलवारपणे कानावर पडलेला व खळबळ सुरू
झालेली. हे चौथ्या नवतेचे काय गौडबंगाल आहे, हे समजायला मार्ग नव्हता; मात्र ह्याची जोरदार
चर्चा सुरू झालेली. श्रीधरने त्याची बाजू ठाम मांडलेली व त्यासोबत ‘चिन्ह संस्कृती’ हासुद्धा एक
अद्भुत बाण मराठी कवींवर सोडलेला. आता कविता तर लिहिलेल्या आहेत; पण त्या ‘चौथी’
आहेत की नाही, ह्याचा एक जोरदार पेच आम्हा गावगल्लीतल्या कवींपुढे निर्माण होताना दिसू
लागलेला ! धावता धावता एकदम थांबावे तसे काही कवींनी लिहिता लिहिता थांबा निर्माण
केलेला, हालत खराब झालेली, एकदम झिनझिनाट! आता आपलं काही खरे नाही असं वाटू
लागलेलं. गावगल्लीतला एक कविमित्र म्हनला, “च्यायला, आपलं कवितेतलं करिअर संपलं.”
चौथ्या नवतेची डाळ काही आपल्या भांड्यात शिजणार नाहीच ह्याचं दुःख त्याच्या बोलण्यातून
टपकताना दिसलं. मी त्याला म्हनलो, “सलिम लंगडे पे मत रो।” प्राचीन कविता ते साठोत्तरी –
सर्वांना फाट्यावर मारून आता ‘चौथी नवता’. काही कवींकडून समजून घेतले की चौथी नवता
मंजे एकदम फ्रेश माल, मंजे पूर्वसुरीचा काहीच प्रभाव नसलेलं, भीडसे अलग, नो उचलाउचली,
हटके, मोडलोड, लय भारी डॉट कॉम, असे काय काय ! हे एकदम जोरदार होतं. श्रीधरभायने
बोला तो कुछ तो बात जरूर होगी! उसका मराठी कवितेमे रुतबा और हुकूम था। उसकी समीक्षा में
भी अलग आवाज थी। जो बोलता हूँ, में वही करता हूँ। जो नहीं बोलता हूँ, वो तो डेफिनेटली
करता हूँ, असा बाणा ह्याची देही व ह्याची डोळा पाहणारी बरीच मंडळी होती. भाईने बोल दिया ना
चौथी नवता, फिर खल्लास, ज्यादा आवाज नहीं करनेका। लिखनेका… वो भी ‘चौथी नवता’ में,
नहीं तो खल्लास ! आपली तर एकदम पाचावर धारणच बसलेली. आयला, ये सब कहा से लाने
का? इतके दिवस जे काही लिहून झालं ते मंजे एकदम फाफुगिरी की काय? श्रीधरने हंटर काढला
होता व त्याच्या फटकाऱ्याखाली अनेक कवी येताना दिसू लागले. आपली नेहमीची कवितेची
भाषा बदलू लागलेले, मोडतोड करू लागलेले, अपना भी नाम ये चौथी नवता के टायटल के
नीचे आना मंगता है, बापू असे एकमेकांना सुचवू लागलेले, तू चौथ्या नवतेत नाही? मंजे
कायतरी तुझा केमिकल लोचा आहे रे गड्या, असे वाटू लागलेले. भायने बोल दिया, ये चौथे
नवतेमे ये कवी है। बोल तू क्या बोलता है? आपन तर झाटूक माटूक काय बोलनार? हा भाय,
आप एकदम सही है। मुरलीधरने तिसरा टाकावा तसा हा कवी ‘चौथी नवता’ टाकतो मनून आपून
मान डोलावलेली. क्या डाला है चौथा! एकदम सामनेवाला तो क्लीन बोल्ड !
– वर्जेश सोळंकी
ISBN : 978-81-985199-7-9
Publisher : Popular Prakashan Pvt. Ltd
Language: Marathi
Number of page’s : 538
Year of Publication : 2026





