Khuntyanvar Tangaleli Dukkha (खुंट्यांवर टांगलेली दुःखं) – Eknath Patil (एकनाथ पाटील)
वर्तमानाला संवादी असणारी ही कविता स्वतःला आपल्या परंपरेतील ‘सत्त्वा’ला जोडून घेते आणि आपली स्वत ची प्रतीक व्यवस्था निर्माण करते, पंढरी, विठोबा, तुकाराम, आई, पांडुरंग सदाशिव साने, नांगर, तुळस ही तिची प्रतीक व्यवस्था आहे. या सर्वांशी कवी स्वतःला जाणीवपूर्वक जोडून घेतो. हे जोडून घेणं उथळ नाही; तर ते खूप आतून आहे. तमाम कृषिजनसस्कृतीची प्रतीक ही एकनाथ पाटील यांच्या कवितेतील गाभाभूत प्रतीक आहेत. या सान्याच प्रतीकांचा अभिव्यक्ती आणि आशयाच्या बहुस्तरीकरणासाठी त्यानी केलेला वापर कचितेला संचन करणारा तर आहेच, शिवाय तो अनोखा आणि वाचकाच्या मेट्ला झिणझिण्या आणणारा आहे. महणून ही कविता वाचकाला तळामुळातून हादरवून आणि भणभणून सोडते हेच तिच मोठं बलस्थान आहे.
ISBN: 978-81-7185-977-1
Number of pages: 112
Language: Marathi
Cover: Paperback
Year of Publication: 2009