हृदय : श्याम मनोहर

85.00 Original price was: ₹85.00.68.00Current price is: ₹68.00.
Category:

Hriday (हृदय) – Shyam Manohar (श्याम मनोहर)

‘हृदय’ हे श्याम मनोहरांचे नाटक सत्यदेव दुबे यांनी दिग्दर्शित केले आणि त्याचा पहिला प्रयोग १९८४ मध्ये छबिलदासच्या रंगमंचावर झाला. महाराष्ट्रभर विविध प्रायोगिक संस्थानी याचे प्रयोग केले.

‘हृदय’ या नाटकातील काळ एकोणिसशे सत्तरच्या आसपासचा. पण आज हे नाटक वाचताना, चंगळवादामध्ये फसलेल्या माणसांची केविलवाणी धडपड जाणवते.

शिक्षणातील यश असो वा कार्यकर्तृत्व असो, सारेच किती बेगडी झाले आहे हे जाणवते. मध्यमवर्गीय बोलघेवड्या माणसांचे शब्द किती फोलकटासारखे झाले आहेत हेही जाणवते. नाटकीय घटनांमधून, परिस्थितीतून सुटण्याचे सारे प्रयत्न माणसाला परत त्याच भोवऱ्यात ओढून नेतात हेही जाणवते वाचकाला वा प्रेक्षकाला नाटकातील पात्रांप्रमाणेच एक विलक्षण थकवा अनुभवास येतो. मनोहरांच्या मते माणसे खरे प्रश्न न विचारता, विचार न करता समस्येला सामोरे जायचा यत्न करतात.

या नाटकातही दैनंदिन जीवनातील क्षुल्लक तपशील आणि अस्तित्वाची गंभीर लढाई यांत एक लक्षणीय अन्वय साधला आहे.

मनोहरांच्या नाटकातील मानवी नात्यांमधील हालचाली याच घटना होतात. ‘हृदय’ आणि ‘यकृत’ या नाटक या नाटकांनी ‘महानिर्वाण’ नंतरच्या काळात प्रायोगिक रंगभूमीला एक नवा चेहरा दिला.

ISBN: 978-81-7185-556-8

No. of pages: 74

Year of publication: 2012

Weight 0.198 kg
Dimensions 21.59 × 13.97 × 0.4 cm