How Sachin Distroyed My Life (हाऊ सचिन डिस्ट्रॉइड माय लाइफ) – Vikram Sathaye (विक्रम साठे)
नव्वदच्या दशकात तरुण सचिन तेंडुलकरने कर्तृत्वाचे नवे मापदंड निर्माण केले आणि देशातल्या सगळ्या तरुणांच्या मनात विलक्षण न्यूनगंड निर्माण केला.
त्याच्या यशाच्या मालिकेने अवाक् झालेल्या अनेकांपैकीच मी एक. पण एक दिवस माझ्या नशिबाने अचानक पलटी मारली आणि माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. क्रिकेट विश्वाची महाद्वारं माझ्यासाठी सताड खुली झाली. थैंक्स सचिन ! मी ‘आतला’ झालो.
क्रिकेटसंबंधीचे विनोद सांगून मनोरंजन करणारा कलावंत म्हणून जगभर माझे कार्यक्रम सादर करत गेली दहा वर्षं मी भारतीय संघाबरोबर प्रवास केला.
माझ्यासह भारतीय क्रिकेटच्या या विलक्षण प्रवासात सामिल व्हा. केवळ ड्रेसिंग रूम आणि हॉटेल्सच नव्हे तर मी तुम्हाला तुमच्या आवडत्या खेळाडूंच्या अंतर्मनाची सफर घडवीन.
बॅटिंग करताना सेहवाग शिळ का घालतो ड्रेसिंग रूममध्ये धोनीला कसलं संगीत ऐकणं आवडतं अतिशय दमला असतानादेखील सचिन स्वतःला कसं रेटत राहतो वर्ल्डकप २००३ च्या वेळी मंदिरा बेदी का रडली राहुल द्रविडला आपला परफॉर्मन्स सुधारण्यासाठी वाचनाचा कसा फायदा झाला इयान चॅपलने हर्ष भोगलेला दम का भरला युवी पंजाब टीमला कधीच इंग्रजी का शिकवणार नाही आणि अशी असंख्य गुपितं !
ISBN: 978-81-7185-471-4
Number of pages: 216
Language: Marathi
Cover: Paperback
Year of Publication: 2017