समाजविकासासाठी व्यक्तिविकास : डॉ. इंदुमती पारीख

238.00 Original price was: ₹238.00.190.40Current price is: ₹190.40.

Non-Fiction

Samajvikasathi Vyaktivikas (समाजविकासासाठी व्यक्तिविकास) – Dr. Indumati Parikh (डॉ. इंदुमती पारीख)

भारतातील सामान्य माणूस आज अडाणी, हतबल, दरिद्री व हताश झालेला दिसतो. भविष्यकाळात आपले जीवन सुधारेल याची फारशी आशा नसल्यामुळे तो देववादी दैववादी बनत आहे. आणि दुसऱ्या बाजूस तो अतिरेकी, हिंसक बनत आहे. शिक्षण नाही, संस्कार नाही. ते मिळण्याची संधी समाज मिळू देत नाही. त्यामुळे माणूस स्वतःचा व समाजाचा विकास घडवू शकत नाही. अशा समाजात फार मोठे परिवर्तन घडवून आणण्याची गरज कोणाही सुज्ञ माणसाच्या लक्षात येते. त्यासाठी समाजातील उणिवा लक्षात घेऊन परिवर्तन कसे व कोणत्या मार्गांनी करावे याचा ऊहापोह या पुस्तकात केलेला आहे.

माणसाच्या जीवनाचा आवाका किती मोठा आहे याकडेही हे पुस्तक आपले लक्ष वेधते. प्रत्येक माणसाला विविध विषयांचे कळतनकळत ज्ञान मिळवावे लागते. अनेक समस्यांना विचारपूर्वक तोंड द्यावे लागते. प्रत्यक्षात मिळालेले ज्ञान, माहिती व अनुभव यांच्या जोरावर आपण जीवन जगत असतो. या समग्रलक्षी जीवनात अनेक विषयांची ओळखही न होता पुढे येणाऱ्या समस्या सोडवाव्या लागतात. यासाठी आपल्याला थोडे फार मार्गदर्शन आईवडील, शिक्षक आणि आपले सवंगडी यांच्याकडून मिळत असते. नव्या जगात माणसाने झपाट्याने बदलण्याचा काळ आला आहे. त्यासाठी थोडीफार पूर्वतयारी या पुस्तकाद्वारे होऊ शकेल. व्यक्ती व समाज या दोहोंच्या विकासासाठी वैचारिक सुसंवाद साधण्याचे मोलाचे कार्य या पुस्तकाने केले आहे.

ISBN: 81-7185-798-1

Number of pages: 238

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 2003