सदानंदयात्रा : सदानंद भटकळ

325.00 Original price was: ₹325.00.260.00Current price is: ₹260.00.

Fiction

Category:

Sadanandyatra (सदानंदयात्रा) – Sadanand Bhatkal (सदानंद भटकळ)

हिंदुस्थानाच्या ग्रंथक्षेत्रात सदानंद भटकळ यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. लेखक, कवी, पॉप्युलर बुक डेपोचा विस्तार करणारे; भारतीय पुस्तकांना परदेशी बाजारपेठ निर्माण करणारे; ग्रंथ व्यावसायिकांची संघटना बांधणारे ग्रंथविषयक नियतकालिके नेटाने चालवणारे; नॅशनल बुक ट्रस्ट, युनेस्कोसारख्या संस्थांसाठी अथक काम करणारे; कुटुंबातील, संस्थेतील आणि समाजातील अनेकांना सातत्याने उत्तेजन देणारे; निरनिराळ्या विषयांवर लेखन करणारे आणि मराठीच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘संक्षिप्त मराठी वाङ्मयकोशाचे संयोजन आणि संपादन यशस्वीरीत्या करणारे.
ही बहुविध रूपे ‘सदानंदयात्रा’मध्ये क्रमशः हवी होती. त्यासंबंधी फक्त काहीच, तरी विलोभनीय, अशा आठवणी सदानंद भटकळ यांनी ‘प्रिय रसिक’मधून लिहिल्या. त्यासोबत त्यांच्या बहुरंगी आयुष्याचे निदान कवडसे दिसावेत म्हणून त्यांचा जीवनपट चित्ररूपाने आणि शब्दरूपाने दिला आहे.

ISBN: 978-81-7991-889-0

Number of pages: 242

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 2016