Ajit Dalvi (अजित दळवी ) : Shatakhanda (शतखंड)
अजित दळवी यांचे हे प्रस्तुत नाटक ‘शतखंड’ आणि गोविंद पुरुषोत्तम देशपाडे यांचे ‘उध्वस्त धर्मशाळा ही नायककेन्द्री आहेत, परंतु या दोन्हीही नाटककारांना सामाजिक-राजकीय इतिहासाचे, त्या इतिहासाने घडविलेल्या मानसिक प्रतिक्रियांचे जे भान आहे, विविध सामाजिक स्तरांच्या राजकारणीकरणांच्या प्रश्नांमधील गुंतागुंत जाणून घेण्याचे जे कुतूहल आहे, त्यामुळे या नाट्यकृतीमधील अनुभव अधिक अर्थपूर्ण झाला आहे.
‘शतखंड’ या नाटकात व्यक्त होणारा अनुभव, गेल्या पंचवीस वर्षांतील महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय जीवनाकडे लक्ष पुरविणान्या कोणालाही परिचित असा आहे. पण तो नाट्यरूपात व्यक्त होताना प्रेक्षकांना परिचिताचा अनुभव देऊन अपेक्षित प्रतिसाद मागणारा नाही. कारण शतखंडित असलेल्या प्राध्यापक धादकळकरांच्या व्यक्तिमत्त्वयातून नाटककार बाचक-प्रेक्षकाला अभिजन वर्गाच्या शोकांतिकेविषयी अंतर्मुख व्हायला लावतो, आणि ते करीत असतानाच बुद्धिजीवी माणसाची स्वतःला बाजवीपेक्षा गांभीयनि सादर करण्याची जी प्रवृत्ती आहे त्यावर नाटककाराने विनोदाचा अंकुश वापरला आहे.
– पुष्पा भावे यांच्या प्रस्तावनेवरून
ISBN : 978-81-7185-331-1
Publisher : Popular Prakashan Pvt. Ltd
Language: Marathi
Number of page’s : 64
Year of Publication :1st Reprint 2026





