विवर्त : प्रभा गणोरकर

30.00 Original price was: ₹30.00.24.00Current price is: ₹24.00.

Fiction

Vivarta (विवर्त) – Prabha Ganorkar (प्रभा गणोरकर)

व्यतीत’ नंतर उच्चारलेला ‘विवर्त’ हा पुढचा शब्द आहे. या संग्रहातील कवितांमधून मुख्यतः नेणिवेतील स्त्रीत्व व्यक्त झालेले आहे. रुजणे, वाढणे, झिजणे, उखडणे या अस्तित्त्वाच्या अपरिहार्य संदभर्भातून ‘झाड’ ही आदिबंधात्मक प्रतिमा या कवितेत वारंवार येते ती यामुळेच. या कवितेची भाषा अनुभव जसाच्या तसा पोहोचवणारी, थेट भिडणारी अशी आहे. स्वाभाविकच तिला आविष्कारासाठी पौराणिक संदर्भ, विज्ञान-प्रतिमा किंवा आधुनिक राजकीय-सामाजिक संकल्पनांची आवश्यकता राहत नाही. मात्र व्यक्तीचे जीवन व्यापून असणाऱ्या, दैनंदिन अनुभवाच्या अगदी साध्यासाध्या गोष्टी विलक्षणपणे प्रतिमारूप होऊन जातात. ‘व्यतीत’ मध्ये प्रकटलेले वेगळेपण कायम ठेवून ही कविता गेल्या दहा वर्षांत अधिक खोल व गंभीर होत गेलेली आहे.

– वसंत आबाजी डहाके

ISBN: 81-7185-284-X

Number of pages: 100

Language: Marathi

Cover: Paperback

Year of Publication: 1985

Weight 0.200 kg
Dimensions 5 × 7 cm